शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

सात लाख हेक्टरमधील पेरण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2017 00:04 IST

रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आर्द्रा नक्षत्रावर शेतकऱ्यांची मदार होती.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आर्द्रा नक्षत्रावर शेतकऱ्यांची मदार होती. मात्र या नक्षत्रातील चार दिवस कोरडे गेल्याने शेतकऱ्यांसमोर समोर नवे संकट उभे ठाकले आहे. जिल्ह्यात अद्याप ६ लाख ८० हजार हेक्टरमध्ये पेरण्या खोळबंल्या आहेत. पाऊसच नसल्याने बियाणे बाजार थंडावला आहे.यंदाच्या खरिपासाठी जिल्ह्यात सात लाख २८ हजार हेक्टर क्षेत्राचे नियोजन आहे. मृग नक्षत्रापूर्वी शेतकऱ्यांनी शेतांची खरीपपूर्व मशागत केली. पाऊस येणार या अपेक्षेने किमान ४० हजार हेक्टरमध्ये पेरणी केली. जमिनीत पुरेसा ओलावा नसल्याने बिजांकुरण झालेच नाही. त्यामुळे बियाणे कुजायला लागले. ज्या ठिकाणी बिजांकुरण झाले, त्या ठिकाणी इवलीशी रोपे करपायला लागली.त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.यंदाच्या खरीप हंगामासाठी धारणी तालुक्यात ४६ हजार ६४२ हेक्टर,चिखलदरा २५ हजार २५४ हेक्टर, अमरावती ५७ हजार ७९१ हेक्टर, भातकूली ५० हजार ३५५ हेक्टर, नांदगाव खंडेश्वर ६७ हजार ७७३, चांदूर रेल्वे ४२ हजार ६५१ हेक्टर, तिवसा ४५ हजार ४४४ हेक्टर, मोर्शी ६२ हजार ८४१ हेक्टर,वरूड ४८ हजार ६४६ हेक्टर, दर्यापूर ७० हजार ६६४ हेक्टर, अंजनगाव सुर्जी ४५ हजार ५०३ हेक्टर,अचलपूर ४७ हजार ९८३ हेक्टर, चांदुर बाजार ६० हजार ९९७ हेक्टर, व धामणगाव रेल्वे तालुक्यात ५५ हजार ४३८ हेक्टर क्षेत्राचे नियोजन आहे.असे आहे तालुकानिहाय पेरणी झालेले क्षेत्र४जल्ह्यात सद्यस्थितीत ३८,७४४ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ४१ टक्के म्हणजेच १८,९२९ हेक्टरवर धारणी तालुक्यात पेरणी झाली आहे. अमरावती ४१४ हेक्टर, भातकुली २४५ हेक्टर, नांदगाव खंडेश्वर ३०८ हेक्टर, चांदूर रेल्वे १३० हेक्टर, तिवसा २८४ हेक्टर, मोर्शी २,९२९ हेक्टर, वरूड ३,०९३ हेक्टर, दर्यापूर १२ हेक्टर, अंजनगाव सुर्जी ४९० हेक्टर, अचलपूर ७७६ हेक्टर, चांदूरबाजार १,१३१ हेक्टर, धामणगाव रेल्वे तालुक्यात १० हजार तीन हेक्टरमध्ये पेरणी झाली आहे. यामधील किमान ३० हजार हेक्टर क्षेत्रात दुबार पेरणीचे सावट आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येणार आहे.२४ दिवसांत केवळ ७३ मि.मी. पाऊसजिल्ह्यात १ ते २४ जूनदरम्यान ११६.९ मि.मी. पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्ष ७३.२ मि.मी. पाऊस पडला आहे. ही ६२.६ टक्केवारी आहे. आतापर्यंत अमरावती तालुक्यात ८७, भातकुली ५१.३, नांदगाव ८६.८,चांदूररेल्वे ८४.१, धामणगाव रेल्वे ८८.१, तिवसा ७२, मोर्शी ७३.६, वरूड ५५.५, अचलपूर ५९.७, चांदूरबाजार ५४.९,दर्यापूर ७६.६, अंजनगाव सुर्जी ५९.८, धारणी ७१.२ व चिखलदरा तालुक्यात १०३.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मान्सूनची स्थिती वायव्य राजस्थान ते वायव्य बंगालचा उपसागरदरम्यान कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे. उत्तर बंगालच्या उपसागरात तीन किमीवर चक्राकार वारे व उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी ते केरळ दरम्यान कमी दाबाची द्रोणीय स्थिती असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ अनिल बंड यांनी दिली.