शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

दहा एटीएमपैकी केवळ दोन ठिकाणीच सुरक्षा रक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 05:00 IST

शहरात विविध बँकांची सुमारे १५२ एटीएम सेंटर आहेत. शहरात आतापर्यंत दोन वेळा एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला.  विशेष म्हणजे, या एटीएमपैकी एकाही एटीएमला सुरक्षा रक्षक नेमलेला नव्हता तसेच एकाही एटीएममध्ये सायरन सिस्टीम बसवलेली नव्हती. अमरावतीकरांच्या सुदैवाने शहरात अद्याप तरी एकाही ठिकाणाला कुठल्याही अनुचित घटनेचा स्पर्श झालेला नाही. 

प्रदीप भाकरेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील सर्व बँकांनी एटीएम सेंटरच्या सुरक्षिततेबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) ठरवून दिलेल्या मानकांना फाटा दिला आहे. गत आठवड्यात तपोवन परिसरातील एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला होता. त्यात चौघांना अटकदेखील करण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर एटीएमच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या अनुषंगाने लोकमतने गुरुवारी दुपारी शहरातील १० एटीएमची स्थिती न्याहाळली. त्यात १० पैकी जिल्हा बँक व इर्विन चौक स्थित दोन एटीएमच्या ठिकाणी सुरक्षा रक्षक आढळून आले. आरबीआयने एटीएम सेंटरच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षक, सायरन, सीसीटीव्ही कॅमेरे, फ्लॅश लाइट्स अशा प्रकारची मानके आखून दिली आहेत. मात्र, अद्याप एकाही बँकेने एटीएम सुरक्षिततेच्या बाबतीत या मानकांची पूर्तता केली नसल्याचे समोर आले आहे. शहरात विविध बँकांची सुमारे १५२ एटीएम सेंटर आहेत. शहरात आतापर्यंत दोन वेळा एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला.  विशेष म्हणजे, या एटीएमपैकी एकाही एटीएमला सुरक्षा रक्षक नेमलेला नव्हता तसेच एकाही एटीएममध्ये सायरन सिस्टीम बसवलेली नव्हती. अमरावतीकरांच्या सुदैवाने शहरात अद्याप तरी एकाही ठिकाणाला कुठल्याही अनुचित घटनेचा स्पर्श झालेला नाही. 

येथे नोंदविले निरीक्षण‘लोकमत’ने राजकमल चाैक, राजापेठ, कंवरनगर मार्गावरील दोन, शंकरनगर, गर्ल्स हायस्कूल, गांधी चौक, गाडगेनगर व इर्विन चौकातील दोन अशा एकूण १० ठिकाणच्या एटीएमची स्थिती जाणून घेतली. पैकी इर्विन चौकातील दोन्ही एटीएम स्थळी सुरक्षारक्षक आढळून आले. तेथील एका ठिकाणी सुरक्षारक्षक असला तरी एटीएमबाहेर ‘एटीएम बंद आहे’ असा फलक झळकला होता. सहा ते सात एटीएममध्ये कागदांचा खच आढळून आला.

अशी आहेत मानकेएटीएम सेंटरच्या सुरक्षिततेसाठी काय खबरदारी घ्यावी, याची मानके आरबीआयने ठरवून दिलेली आहे. यामध्ये एटीएम सेंटरमध्ये सायरन, एटीएमच्या बाहेर फ्लॅश लाईट, फक्त रेकॉर्डिंगच्या उद्देशाने कॅमेरे न बसविता आतील आणि बाहेरील अशा दोन्ही भागांचे चित्रीकरण करणारे कॅमेरे असावेत. स्वयंचलित लॉक होणारे दरवाजे तसेच सुरक्षारक्षकांची नेमणूक या मानकांचा समावेश आहे. अनेकदा बँकांचे एटीएम निर्जन स्थळी किंवा रस्त्यापासून काही अंतरावर असतात. त्यामुळे एटीएमला सायरन सिस्टीम बसविणे गरजेचे आहे, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीमध्ये परिसरातील रहिवासी मदतीला येऊ शकतात.

पोलीस आणि बँक अधिकाऱ्यांची बैठकशहरातील ९५ टक्के एटीएमला सुरक्षा रक्षक नाहीत. या पार्श्वभूमीवर बुधवारी पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये बँकेच्या एटीएम सुरक्षिततेसाठी काय करता येईल, सुरक्षिततेच्या मानकांची अंमलबजावणी का व कशी करावी, याबाबत चर्चा झाली. 

एटीएम सेंटर ही बँकेची मालमत्ता आहे. तिचे संरक्षण करणे याची जबाबदारीही बँकेचीच आहे. आरबीआयनेही त्या संदर्भात काही मानके ठरवून दिलेली आहेत. मात्र, बँकांकडून या मानकांचे पालन केले जात नाही. त्यामुळे एटीएम सुरक्षेबाबत बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना काही सूचना करण्यात आल्या आहे.- विक्रम साळी, पोलीस उपायुक्त

काही एटीएमस्थळी समस्या आहेत. संबंधित बँकांना त्याबाबत सूचना दिल्या जातील. एटीएमची जबाबदारी संबंधित बँकांची आहे. - जितेंद्र झा, व्यवस्थापक, अग्रणी बँक 

 

टॅग्स :atmएटीएम