शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
5
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
6
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
7
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
8
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
9
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
10
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
11
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
12
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
13
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
14
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
15
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
16
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
17
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
18
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
19
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा

सचिवपुत्र अजिंक्य गोसावीला अखेर अटक

By admin | Updated: December 27, 2014 22:42 IST

तपोवनच्या बालगृहातील मुलींच्या लैंगिक शोषणप्रकरणी पदावनत संस्था सचिव श्रीराम गोसावीचा मुलगा अजिंक्य ऊर्फ सोनू याला गाडगेनगर पोलिसांनी शुक्रवारी उशिरा अटक केली. न्यायालयाने

‘तपोवन’ बालगृहातील अत्याचार प्रकरण : आणखी काहींवर कारवाईची टांगती तलवारअमरावती : तपोवनच्या बालगृहातील मुलींच्या लैंगिक शोषणप्रकरणी पदावनत संस्था सचिव श्रीराम गोसावीचा मुलगा अजिंक्य ऊर्फ सोनू याला गाडगेनगर पोलिसांनी शुक्रवारी उशिरा अटक केली. न्यायालयाने त्याला २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ‘लोकमत’ने सचिवपुत्र अजिंक्य गोसावीच्या कृत्यांबाबतचे वृत्त पुराव्यानिशी प्रसिध्द केले होते, हे येथे उल्लेखनीय.काही दिवसांपूर्वी तपोवन येथील मुलींच्या वसतिगृहातील दोन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना उघड होताच शहरात खळबळ उडाली. पीडित मुलींनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गाडगेनगर पोलिसांनी नारायण कोठेवार, प्रदीप खंडारे या नराधमांना अटक केली होती. त्यानंतर संस्थेचे पदाधिकारी गजानन चुटे व श्रीराम गोसावी यांनाही चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान पोलिसांसमोर अनेक तथ्यांचा उलगडा झाला. पोलिसांनी बालगृहाबाहेर लावलेल्या तक्रारपेटीत मुलींच्या डझनांनी तक्रारी प्राप्त झाल्यात. त्याअनुषंगाने तपास करून पोलिसांनी आरोपींना अटक केली. मुलींनी तक्रारींमध्ये त्यांच्यावर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराची सविस्तर माहिती दिली होती. काही मुलींनी तर अजिंक्य गोसावीविरुद्ध तक्रार केली होती. शुक्रवारी पुन्हा एका पीडित मुलीने अजिंक्य गोसावीविरुद्ध गाडगेनगर पोलिसांकडे तक्रार नोंदविल्यानंतर अजिंक्य गोसावीला अटक करण्यात आली. जुलै २०१२ ते जुन २०१४ च्या दरम्यान मुलींना धमकावणे व छेडखानी सोबतच, मुलीच्या पुस्तकांवर अश्लिल एसएमएस लिहत होता.