अमरावती : जिल्ह्यातील ७४८ पैकी २०० हून अधिक माध्यमिक शाळांची घंटा १५ जुलै रोजी ग्रामीण भागात वाजली आणि आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग भरण्यास सुरुवात झाली. माध्यमिक शाळा सुरू झाल्या असताना प्राथमिक शाळांच्या पातळीवर अजून तळ्यातमळ्यातच सुरू आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील वर्ग सुरू होणारी की नाही, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेण्यात अडचणी येत असल्याने पालकांच्या विनंतीनुसार माध्यमिक शिक्षण विभागाने कोरोनामुक्त असलेल्या ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार व गावस्तरावर गठित समितीच्या शिफारसीने ग्रामीण भागातील शाळा शाळा सुरू करण्यास मंजूर दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ७४८ माध्यमिक पैकी जवळपास २०० हून अधिक शाळा शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून शाळा सुरू झाल्या आहेत. मार्गदर्शक सूचनांचे पालन करून शाळा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, याच माध्यमिक शाळांच्या धर्तीवर प्राथमिक शाळा आता सुरू होणार की नाहीत, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे; परंतु या शाळा सुरू करण्याच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून अद्यापतरी कुठल्याही हालचाली दिसून येत नाहीत. विभागाकडून अद्यापतरी कुठल्याही हालचाली दिसून येत नाहीत.
बॉक्स
प्राथमिक शाळा - १,५८३
माध्यमिक शाळा - ७४८
कोट
शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकारच्या काही सूचना अद्याप आलेल्या नाहीत. यासंदर्भात शासन स्तरावरून सूचना आल्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनुसार योग्य कारवाई केली जाईल.
-गंगाधर मोहने,
उपशिक्षणाधिकारी प्राथमिक