शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

बच्चू कडूंच्या प्रयत्नातून अचलपूरला दुसरे पोलीस ठाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 6:00 AM

२२ ऑक्टोबर २००७ रोजी अचलपूर शहरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील अचलपूर शहरात आले असता त्यांच्यापुढे दुसऱ्या पोलीस ठाण्याची मागणी आमदार बच्चू कडू यांनी ठेवली होती. यावर शासनाने अचलपूर पोलिसांकडून सविस्तर प्रस्ताव शासनाने मागविला.

ठळक मुद्दे८३ वर्षांनंतर पुनर्जिवित : साडेसहा कोटींचा निधी, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र क्वॉर्टर्स

अनिल कडू ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : संवेदनशील असलेल्या अचलपूर शहराला आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नातून दुसरे पोलीस ठाणे मिळाले आहे. त्यांच्या सततच्या पाठपुराव्याने तब्बल ८३ वर्षांनंतर सरमसपुरा पोलीस ठाण्याचे पुनर्जिवित झाले असून, यासाठी ६ कोटी ५६ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे.२२ ऑक्टोबर २००७ रोजी अचलपूर शहरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील अचलपूर शहरात आले असता त्यांच्यापुढे दुसऱ्या पोलीस ठाण्याची मागणी आमदार बच्चू कडू यांनी ठेवली होती. यावर शासनाने अचलपूर पोलिसांकडून सविस्तर प्रस्ताव शासनाने मागविला. निर्धारित लोकसंख्या, येणारी धार्मिक स्थळे, लोकांची जातीनिहाय विभागणी आणि समाविष्ट करता येणाºया मोहल्ल्यांची माहिती देत अचलपूर शहरातील सरमसपुऱ्यात नवे पोलीस ठाणे प्रस्तावित केल्या गेले आणि शासनाने त्याला मान्यताही दिली.सन २००९ मध्ये सरमसपुरा पोलीस ठाण्याकरिता एक पोलीस निरीक्षक, दोन उपनिरीक्षक, २० हवालदार आणि ४० पोलीस कर्मचारी शासनाने मान्य केलेत. सन २००१ च्या जनगणनेनुसार ३० ते ३५ हजार लोकसंख्या विचारात घेतल्या गेली. सरमसपुऱ्यासह मेहराबपुरा, नवबागपुरा, सुलतानपुरा, मंजूरपुरा, रायपुरा, सवईपुरा, नशीबपुरा, जोगीपुरा मिळून अचलपूर शहरातील १२ ते १५ पुरे (मोहल्ले) या नव्या पोलीस ठाण्यांतर्गत समाविष्ट केल्या गेले. या नव्या पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या बांधकामाचे अंदाजपत्रक, त्याचा आराखडा सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूरने बनवून गृहविभागाकडे सादर केला. दरम्यान प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाली; प्रत्यक्षात मात्र निधी उपलब्ध झाला नाही. यात भाड्याच्या घरातून सरमसपुरा पोलीस ठाण्याचा कारभार सन २०१४ पर्यंत सुरू होता. यावर आमदार बच्चू कडू यांनी शासन दरबारी पाठपुरावा करीत पोलीस स्टेशनच्या प्रशासकीय इमारतीकरिता ५६ लाखांचा, तर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाकरिता ६ कोटींचा निधी खेचून आणला.नव्या इमारतीतून कामकाजआमदारांच्या प्रयत्नातून सार्वजनिक बांधकाम विभागाने जवळपास ५६ लाख रुपये खर्च करून सरमसपुरा पोलीस ठाण्याची प्रशासकीय इमारत उभी केली. या नव्या इमारतीतून पोलीस स्टेशनचे प्रशासकीय कामकाज सुरू झाले आहे. उपविभागीय अभियंता विजय वाट, शाखा अभियंता गोपाल बकाले यांच्या नियंत्रणात ही इमारत उदयास आली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचे बांधकाम प्रगतिपथावर आहे. यात पीआय व एपीआयकरिता दोन स्वतंत्र निवासस्थानांसह ३२ कर्मचाऱ्यांकरिता ३२ क्वॉर्टर्स बांधली जात आहेत.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेBacchu Kaduबच्चू कडू