शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

दुसºयाही दिवशी एसटीची चाके थांबलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 23:15 IST

राज्याची जीवनवाहिनी असलेली एसटी बसची चाके दुसºया दिवशी बुधवारीदेखील ठप्प होती.

ठळक मुद्देप्रवाशांचे हाल : खासगी वाहतूकदारांकडून लूट, संपकरी मागण्यांवर कायम

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्याची जीवनवाहिनी असलेली एसटी बसची चाके दुसºया दिवशी बुधवारीदेखील ठप्प होती. संपाचा लाभ घेत खासगी वाहतूकदारांनी अव्वाच्या सव्वा भाडे आकारून प्रवाशांची अक्षरश: लूट चालविली आहे, तर एसटी कर्मचारी मागण्यांवर ठाम आहेत.जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेल्या ४४७ एसटी बसची चाके दिवाळीच्या दोन दिवस आधी थांबली. जिल्ह्यातील चालक, वाहक, यांत्रिकी व इतर असे एकूण २३०० कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे विविध जिल्ह्यांमध्ये दररोज जाणाºया ११२० फेºया रद्द झाल्या. दररोज ५० ते ६० हजार प्रवासी एसटीने प्रवास करतात. यातून एसटीला ३० ते ३५ लाख रूपयांचे रोज उत्पन्न मिळते. दोन दिवसांपासून कर्मचाºयांच्या संपामुळे हे उत्पन्न बुडाले आहे. दिवाळीसाठी आपल्या गावी जाणाºया प्रवाशांची बुधवारीही कसरत झाली. संपाचा फायदा खासगी काळीपिवळी वाहने, इतर बसेस व प्रवासी वाहनांनी घेतला असून, त्यांनी १० ते १५ टक्के अतिरिक्त भाडेवाढ करून प्रवाशांची लूट केली. नोकरदार वर्गाचीही चांगलीच गोची झाली आहे.२२ संघटनांचा संपात सहभागराज्यभर १ लाख १७ हजार कर्मचाºयांनी संपात सहभाग घेतला असून, २२ विविध एसटी कर्मचाºयांच्या संघटना सहभागी झाल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, इंटक (कॉग्रेस), कनिष्ठ वेतनश्रेणी संघटना, विदर्भ एसटी कामगार संघटना, संघर्ष, सोशल मीडिया अशा अनेक संघटना यामध्ये सहभागी झाल्या असल्या तरी आगर व्यवस्थापक, वाहतूक निरीक्षक, पर्यवेक्षक व इतर कुठलेही मोठे अधिकारी संपात सहभागी झालेले नाही.खासगी वाहनांवर प्रवाशांची धावएसटी बसेसची चाके दिवाळीच्या पूर्वसंध्येला अचानक थांबल्यामुळे नागरिकांना आपल्या गावी जाण्यासाठी कुठलाच पर्याय उरला नव्हता. त्यामुळे त्यांना काळीपिवळी वाहने, खासगी बस, आॅटोरिक्षा तसेच प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी भरलेल्या इतर अनेक वाहनांनी प्रवास करावा लागला. नागरिकांनी बुधवारीदेखील जीव धोक्यात टाकून प्रवास केला. या दरम्यान प्रवाशांकडून जादा पैसेही उकळण्यात आले.मध्यवर्ती आगारात पदाधिकाºयांची निदर्शनेकर्मचाºयांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय शासन घेणार नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, अशी भूमिका संपात सहभागी झालेल्या कर्मचाºयांनी व त्यांच्या संघटनांनी घेतली. मध्यवर्ती आगारात कर्मचारी विविध संघटनांच्या पदाधिकाºयांनी एकत्रित येऊन निदर्शने केली. येथे विविध पदाधिकाºयांनी आपली मतेसुद्धा व्यक्त केली. एसटी कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष मोहित देशमुख, सचिव शरद मालवीय, महाराष्ट्र मोटर कामगार संघटनेचे अध्यक्ष विजय धांडे, सचिव गणेश तायडे, एसटी कामगार संघटनेचे आगार अध्यक्ष अनिल पांडे, सचिव ए.एस. खान यांच्यासह अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. चालक, वाहक व कर्मचाºयांनीही या ठिकाणी ठिय्या मांडला होता.मला दर्यापूरला जायचे आहे; पण बस नाही. त्यामुळे खासगी वाहन शोधावे लागेल. आमची चांगलीच गैरसोय झाली आहे. शासनाने कर्मचाºयालाही न्याय दिला पाहिजे, असे माझे मत आहे.- दादाराव दवंडे, प्रवासीकर्मचाºयांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही, तोपर्यंत संप सुरूच राहील. बाहेरून बस घेऊन आलेल्या कर्मचाºयांना आगाराच्या निवास्थानात न ठेवण्याचे आदेश आहेत. - मोहित देशमुख, विभागीय अध्यक्ष, एसटी कामगार संघटना