शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

१९ नव्या हॉकर्स झोनवर शिक्कामोर्तब

By admin | Updated: July 30, 2016 23:56 IST

शहरातील विविध क्षेत्रात असलेल्या ४७ हॉकर्स झोनपैकी १९ हॉकर्स झोनवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

 १२०० हॉकर्सची सोय : महापालिकेचा पुढाकार, फेरीवाल्यांना नोटीसअमरावती : शहरातील विविध क्षेत्रात असलेल्या ४७ हॉकर्स झोनपैकी १९ हॉकर्स झोनवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. या १९ ठिकाणी ७५८ फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मुभा राहील. तत्पूर्वी ११ घोषित हॉकर्स झोनमध्ये सुमारे ५०० फेरीवाल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या निर्देशान्वये शहरात सर्वदूर अतिक्रमण निर्मूलन मोहीम चालविल्यानंतर फेरीवाल्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. अतिक्रमण निर्मुलन मोहीम थांबवावी, यासाठी फेरीवाल्यांनी निदर्शनेसुध्दा केलीत. मात्र महापालिका प्रशासन कारवाईवर ठाम राहिले. त्याचवेळी निश्चित आणि प्रस्तावित हॉकर्स झोनमध्येच व्यवसाय करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. चर्चेदरम्यान नोंदणीबद्ध फेरीवाल्यांसाठी तब्बल ४७ नव्या जागा प्रस्तावित करण्यात आल्यात. त्यापैकी १९ जागांवर ७५८ फेरीवाल्यांना बसता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सिमॅक प्रा. लि. कंपनीने केलेल्या फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणामध्ये चार हजारपेक्षा अधिक फेरीवाल्यांची नोंद करण्यात आली. त्यापैकी १६५८ फेरीवाल्यांनी आवश्यक ते दस्तऐवज महापालिकेच्या बाजार व परवाना कार्यालयामध्ये संकलित केलेत. उर्वरीत फेरीवाल्यांसाठी वारंवार मुदतवाढही देण्यात आली. मात्र त्यानंतरही कागदपत्र जमा करण्यात न आल्याने नोंदणीकृत फेरीवाल्यांसाठीच विविध परिसरात हॉकर्स झोन निश्चित करण्यात आले. (प्रतिनिधी)शहरातील या ठिकाणी बसू शकतील फेरीवालेराजापेठ ते दस्तूरनगर रोडवरील विदर्भ आयुर्वेदिक महाविद्यालयालगतचा रस्ता, राजापेठ ते दस्तूरनगर रोडवरील स्वामी सतरामदास विद्यालयासमोरील रस्ता, दस्तूरनगर ते छत्रीतलाव रोडवरील राम-हनुमान मंदिरासमोरील रस्ता, अमरावती ते वलगाव मार्गे नवसारीलगत, अमरावती ते वलगावमार्गे विद्युुतनगर बगिचा व रेखा कॉलनी मैदानासमोर, पंचवटी ते आयटीआय कॉलनीकडे जाणारा रस्ता, विलासनगर ते शेगाव नाका रोड, बियाणी चौक ते मार्डी रोड एसबीआय बँकेसमोरील रस्ता, लालखडी रोड ते अलिमनगर कब्रस्थान उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील रस्ता, विलासनगर तग पाठ्यपुस्तककडे जाणारा रस्ता, वलगाव रोड ट्रक टर्मिनसच्या पूर्वेकडील रस्त्यालगत, निदा उर्दू स्कूलसमोरील मैदानाच्या दक्षिणेकडील रस्त्यालगत, अमरावती विद्यापीठ ते मार्डी रोड दत्तकृपा कॉलनी बोर्डसमोरील रस्त्यालगत, यशोदानगर स्मशानासमोरील रस्त्यालगत, गोपालनगर ते एमआयडीसी मिनीबायपासकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला, गोपालनगर ते निंभोरा जसपना कॉलेजकडे जाणारा रस्ता, गोपालनगर ते अंबा मंगलम कडे जाणारा रस्ता, साईनगर ते अकोली गावाकडे जाणारा डीपी रस्ता.