शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
2
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
3
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
5
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
6
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
7
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
8
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
9
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
10
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
11
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
12
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
13
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
14
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
15
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
16
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
17
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
18
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
19
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
20
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल

Amravati: महिनाभरात ओबीसीच्या ३२५० घरकुल प्रस्तावावर शिक्कामोर्तब, जिल्हा परिषद प्रशासनात लगीनघाई

By जितेंद्र दखने | Updated: January 14, 2024 23:32 IST

Amravati: इतर मागासवगीर्यांसाठी (ओबीसी) केंद्र शासनाच्या मोदी आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात प्रत्येक आठवड्याला आठशे नवीन घरकुलांना मंजुरी दिली जात आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत जिल्हाभरात ३ हजार २५० प्रस्ताव निकाली काढण्यात आले आहेत.

- जितेंद्र दखनेअमरावती : इतर मागासवगीर्यांसाठी (ओबीसी) केंद्र शासनाच्या मोदी आवास योजनेंतर्गत जिल्ह्यात प्रत्येक आठवड्याला आठशे नवीन घरकुलांना मंजुरी दिली जात आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत जिल्हाभरात ३ हजार २५० प्रस्ताव निकाली काढण्यात आले आहेत. जिल्ह्याला योजनेचे सुमारे १४ हजार १७८ घरकुलांचे उद्दिष्ट दिले आहे. सदरचे उद्दिष्ट गाठण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने सीईओ अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनात प्रक्रिया सुरू केलेली आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला गत डिसेंबर महिन्यात या योजनेचे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. त्यानंतर या आठवड्यात ८०० प्रमाणे महिनाभरात ३ हजार २५० प्रस्तावांना मंजुरी देऊन निपटारा करण्यात आला आहे. या लाभार्थ्यांची निवड समाज कल्याण विभागामार्फत केली जात आहे. केंद्र शासनाने २०२४ पर्यंत ग्रामीण भागातील सर्वांसाठी घरी हे धोरण जाहीर केले आहे. यापूर्वी घरकुलासाठीची योजना अनुसूचित जाती व जमाती प्रवगार्साठी होत्या रमाई आवास, शबरी आवास योजना आणि विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना सुरू केली आहे. यामध्ये इतर मागासवर्गीय (ओबीसी)साठी कुठलीही योजना नव्हती, परिणामी मोदी आवास योजनेत त्यांनाही समाविष्ट केले आहे. याकरिता केंद्र व राज्य शासनामार्फत आर्थिक सहायक केले जाते. मोदी आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना १ लाख ३० हजार रुपये अनुदान दिले जाते. तीन टप्प्यांत ही रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा केली जाते. जिल्हा परिषदेने मंजूर केलेल्या सर्व लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित केला आहे.-अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी जागा खरेदीसाठी एक लाखाचे साहाय्यइतर मागासवर्गीय प्रवगार्तील पात्र लाभार्थ्याकडे घरकुलासाठी स्वत:ची जागा उपलब्ध नसेल, तर अशा लाभार्थ्यांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले घरकुल जागा खरेदी अर्थसाह्य योजनेत पाचशे चौरस फूट जागा विकत घेण्यासाठी एक लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी ५०हजार रुपये दिले जात होते. तालुकानिहाय मंजूर घरकुलेतालुका - उद्दिष्ट- मंजुरीअचलपूर -१३६६-४६२अमरावती-८९७-२८६अंजनगाव सुर्जी -७३५-४७भातकुली-५३५-२३५चांदूर रेल्वे -११३१-१५८चांदूर बाजार-११५४-४३९चिखलदरा-२३५-६९दयार्पूर -१६३७-१२८धामणगाव रेल्वे -१००७-७१धारणी-२१७-५३मोर्शी- १४७४_ ७९नांदगाव खंडेश्वर- १३६७_ ५२०तिवसा -१०९७-३०३वरूड -१३५३-४०८एकूण -१४८७८-२३५०

महिनाभरात ओबीसीच्या ३२५० घरकुल प्रस्तावावर शिक्कामोर्तब, जिल्हा परिषद प्रशासनात लगीनघाई

टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजनAmravatiअमरावती