शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

बडनेऱ्यात तीन मशिदींचा परिसर सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2020 05:01 IST

वाशिम जिल्ह्यातील रहिवासी आणि तबलिगी जमातच्या मरकजमधून परतलेल्या या व्यक्तीचे बडनेऱ्यातील जामा मशीद, अलमासनगर व चमननगरातील मशिदीमध्ये २२ ते २८ एप्रिल या कालावधीत वास्तव्य होते. या तिन्ही मशिदींमध्ये प्रत्येकी दोन दिवस वास्तव्य होते. या व्यक्तीसोबत पातूर येथील अन्य १३ जणसुद्धा होते. २८ मार्चला हे सर्व वाशिम जिल्ह्याकडे रवाना झाले.

ठळक मुद्देबाधित व्यक्तींचा सहा दिवस मुक्काम । संपर्कातील १० जणांचे थ्रोट स्वॅब पाठविले

श्यामकांत सहस्त्रभोजने ।लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : वाशिम जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीने बडनेऱ्यातील तीन मशिदींमध्ये सहा दिवस मुक्काम केल्याचे ट्रॅव्हल हिस्ट्रीमध्ये स्पष्ट झाले. त्यामुळे या तिन्ही मशिदींचा परिसर पोलिसांकडून शनिवारी बॅरिकेडिंग करून सील करण्यात आला. सकाळपासून या परिसरात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. संपर्कातील दहा लोकांचे थ्रोट स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.वाशिम जिल्ह्यातील रहिवासी आणि तबलिगी जमातच्या मरकजमधून परतलेल्या या व्यक्तीचे बडनेऱ्यातील जामा मशीद, अलमासनगर व चमननगरातील मशिदीमध्ये २२ ते २८ एप्रिल या कालावधीत वास्तव्य होते. या तिन्ही मशिदींमध्ये प्रत्येकी दोन दिवस वास्तव्य होते. या व्यक्तीसोबत पातूर येथील अन्य १३ जणसुद्धा होते. २८ मार्चला हे सर्व वाशिम जिल्ह्याकडे रवाना झाले. यातील एक व्यक्ती वाशिमला कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याची माहिती शुक्रवारी दुपारी जिल्हा प्रशासनास मिळाल्यानंतर एकच खळबळ उडाली. कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात जर कुणी आले असेल तर त्यांनी समोर येऊन सहकार्य करावे, असे आवाहन बडनेरा पोलीस व महापालिका प्रशासनाने केले आहे. शुक्रवारी उशिरापर्यंत बडनेरा पोलीस व महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाद्वारे संपर्कात आलेल्या दहा लोकांना जिल्हा सामान्य रूग्णालयात आरोग्य तपासणीसाठी पाठविले. त्यांचे थ्रोट स्वॅब घेऊन त्यांना क्वारंटाइन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.वाशिम जिल्ह्यातील बाधित व्यक्तीचे सहा दिवस बडनेºयात वास्तव्य होते. खबरदारी म्हणून परिसर बॅरिकेडिंगने सील करण्यात आले. वरिष्ठांच्या आदेशाने स्थितीवर लक्ष देत आहोत.- पंजाब वंजारीपोलीस निरीक्षक, बडनेरा.कोरोनाग्रस्त वास्तव्यास असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना केली जात आहे. शनिवारी हा परिसर सॅनिटाइज करण्यात आला. संपूर्ण झोन परिसरातच फवारणी केली जात आहे.- विशाखा मोटघरेसहायक आयुक्त, महापालिकानमुन्यांचा अहवाल आज मिळणारबाधिताच्या संपर्कात आलेल्या दहा व्यक्तींचा थ्रोट स्वॅब अहवाल ५ एप्रिल रोजी प्राप्त होईल, असा अंदाज वैद्यकीय अधिकारी वैशाली मोटघरे यांनी व्यक्त केला. दहाही लोकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात ठेवण्यात आले. सील केलल्या मशिदींच्या परिसरात आशा वर्कर, आरोग्य सेविकांची तीन पथके तपासणीची कामे करीत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या