शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

स्क्रब टायफसचा उद्रेक शीघ्र प्रतिसाद पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 22:15 IST

स्क्रब टायफसच्या उद्रेकाचे अन्वेषण करण्यासाठी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी (साथरोग), निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी व वैद्यकीय आरोग्य अधिकारी (महापालिका) यांचा समावेश असलेले शीघ्र प्रतिसाद पथक स्थापन करण्याचे निर्देश आरोग्य उपसंचालक डॉ. नावाडे यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देआरोग्यसेवा उपसंचालकांचे निर्देश : चार अधिकाऱ्यांचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : स्क्रब टायफसच्या उद्रेकाचे अन्वेषण करण्यासाठी अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी (साथरोग), निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी व वैद्यकीय आरोग्य अधिकारी (महापालिका) यांचा समावेश असलेले शीघ्र प्रतिसाद पथक स्थापन करण्याचे निर्देश आरोग्य उपसंचालक डॉ. नावाडे यांनी दिले आहेत.आरोग्य सेवा हिवताप अकोल्याचे सहसंचालक डॉ. अभिनव भुते हे चमूचे प्रमुख असतील. त्यांच्या नेतृत्वात शीघ्र प्रतिसाद पथक स्क्रब टायफसने मृत्यू पावलेले रुग्ण दाखल असलेल्या आरोग्य संस्थेस भेट देईल. संंबंधित रुग्णाच्या औषधपचाराचा सर्व लेखाजोखा, त्या रुग्णात आढळून आलेली लक्षणे, निदान करण्यासाठी तपासण्या यांचा अभ्यास या पथकाला करावा लागणार आहे.नागपूरमध्ये स्क्रब टायफसने पाच बळी घेतल्याच्या पार्श्वभूमिवर अमरावती जिल्ह्यातही अलर्ट घोषित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने डॉ. नावाडे यांनी स्क्रब टायफसच्या प्रतिबंधासाठी अधिनस्थ आरोग्य यंत्रणेला लेखी निर्देश दिले. या आजाराचे पाच रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत. त्यापैकी दोघे शहरातील खासगी रुग्णालयांत दाखल आहेत. अमरावतीत स्क्रब टायफसची एन्ट्री झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश उपसंचालकांनी दिले आहेत.यांच्या नावे आदेशसहायक संचालक आरोग्य सेवा (हिवताप) अकोला. जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ. जिल्हा शल्यचिकित्सक, सामान्य रुग्णालय, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ. जिल्हा हिवताप अधिकारी, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम, यवतमाळ. वैद्यकिय आरोग्य अधिकारी, अमरावती, अकोला महापालिका.उपाययोजनांचे निर्देशताप रुग्ण सर्वेक्षण, कीटकशास्त्रीय सर्वेक्षण, निदान व उपचार, वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाºयांना प्रशिक्षण आणि आरोग्य शिक्षण याप्रमाणे कार्यवाही करावी, असे निर्देश आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. उमेश नावाडे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक, महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी व जिल्हा परिषदेला दिले आहेत.