शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पशुवैद्यकाने काढले पोस्टचे स्क्रिनशॉट मास्टरमाईंड शेख इरफानने रचला कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2022 05:00 IST

२१ जून रोजी रात्री १०.३० च्या सुमारास उमेश कोल्हे यांची गळा कापून हत्या करण्यात आली. शनिवारी त्यांचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. त्यात गळ्यावर एकच वार करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आल्याची माहिती शहर कोतवालीशी संबधित पोलीस अधिकाऱ्याने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला दिली. या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली असून, पैकी डॉ. युसूफ खान व शेख इरफान हे या घटनेचे मुख्य सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : उदयपूर येथील टेलर कन्हैयालाल यांच्यावर अनेक वार करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले असले तरी शहरातील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या गळ्यावर केवळ एक वार करून त्यांना संपविण्यात आले. शवविच्छेदन अहवालावरून ही बाब स्पष्ट झाली. पोलिसांनुसार, कोल्हे यांच्या गळ्यावर पाच बाय सात सेंटिमीटरची एकच जखम आढळून आली आहे. गळ्यातून मेंदूला रक्तपुवरठा करणारी मुख्य नस कापली गेल्याने ते रक्तबंबाळ होत लागलीच जमिनीवर कोसळले. ते कोसळताच तीनही हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. पशुवैद्यक असलेल्या डॉ. युसुफ खान याने कोल्हे यांनी केलेल्या पोस्टचे स्क्रिनशॉर्ट अन्य ग्रुपमध्ये व्हायरल केले व शेख इरफानने हत्येचा कट रचल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. २१ जून रोजी रात्री १०.३० च्या सुमारास उमेश कोल्हे यांची गळा कापून हत्या करण्यात आली. शनिवारी त्यांचा शवविच्छेदन अहवाल पोलिसांना प्राप्त झाला. त्यात गळ्यावर एकच वार करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आल्याची माहिती शहर कोतवालीशी संबधित पोलीस अधिकाऱ्याने नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला दिली. या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली असून, पैकी डॉ. युसूफ खान व शेख इरफान हे या घटनेचे मुख्य सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पाच जण प्यादी असल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस पोहोचले आहेत. पशुवैद्यक व पशुऔषधी विक्रेता म्हणून डॉ. युसूफ खान व उमेश कोल्हे यांच्यात चांगले संबंध होते. मात्र, डॉक्टरने कोल्हे यांची उधारी थकविली. अशातच १६ किंवा १७ जून रोजी कोल्हे यांनी नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट फॉरवर्ड केली. त्या ग्रुपमध्ये असलेल्या डॉ. युसूफ खानने त्या पोस्टचे स्क्रीनशॉट काढून ते आपल्या विविध ग्रुपमध्ये शेअर केले. दरम्यान, शेख इरफान व डॉ. युसूफखान यांच्यातील परस्परसंबंधदेखील पडताळून पाहिले जात आहेत. कोल्हे यांच्या हिशेबाची डायरीदेखील जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.  तब्बल ११ दिवसांनंतर उमेश कोल्हे यांच्या हत्येचा तपासाला वेग आला आहे.  केंद्रीय गृहमंत्रालयाने कोल्हे यांच्या हत्याप्रकरण हे एनआयएकडे सोपविले असून या प्रकरणाचे कनेक्शन आंतरराष्ट्रीय स्तरावर तर नाही, याबाबत तपास केला जात आहे. 

शहर कोतवालीला छावणीचे स्वरूपउमेश कोल्हेे यांची हत्या नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने झाल्याचे निष्पन्न होताच शहर कोतवाली पोलीस ठाण्याला छावणीचे स्वरूप आले. देशभरातील मीडिया पर्सनदेखील कोतवाली ठाण्यात पोहोचले. तेथे भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी व शहराध्यक्ष किरण पातूरकर यांनी मीडियाला बाईट दिले. तत्पूर्वी, कोतवाली पोलीस ठाण्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. काय झाले, गर्दी कशाची म्हणून ये-जा करणारेदेखील थबकत होते. सुरक्षेच्या दृष्टीने ठाण्यात जाण्यास अनेकांना मज्जाव करण्यात आला. 

याही प्रकरणात दाखल होऊ शकतो यूएपीएभारताचं अखंडत्व, सुरक्षा आणि सार्वभौमत्व धोक्यात आणणाऱ्या गोष्टींवरून यूएपीए (अनलॉफुल ॲक्टिव्हिटिज प्रिव्हेंशन ॲक्ट) लावला जातो. दहशतवादी कारवाया करणे किंवा त्या कृतीत सामील होणे, दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन-समर्थन देणे, दहशतवाद घडवण्यासाठी आर्थिक मदत करणे, प्लॅनिंग करणे अशा कृती केल्याने यूएपीए लागू शकतो. उदयपूरच्या घटनेत एनआयएने यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर एनआयएने तपास हाती घेतल्यानंतर कोल्हे हत्या प्रकरणातदेखील आरोपींविरुद्ध यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

बाईक, कार, मोबाईल जप्त?आरोपी शेख इरफानला अटक केल्यानंतर त्याच्याकडून बाईक, चारचाकी वाहन व मोबाईल जप्त करण्यात आला. मात्र, त्याला शहर कोतवाली पोलिसांकडून दुजोरा मिळाला नाही. शेख इरफानच्या मोबाईल डेटावरून अनेक पैलूंचा उलगडा होणार आहे. त्याचे नेमके संबंध कुणाशी, हे जाणण्यासाठी मोबाईल सीडीआर काढला जाणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. 

कोल्हेंना वाहणार आज श्रद्धांजलीनूपुर शर्माच्या समर्थनार्थ पोस्ट टाकली म्हणून २१ जूनला मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हेंची  हत्या करण्यात आली. या घटनेच्या निषेधार्थ भाजपा आक्रमक झाली आहे. भाजप सह हिंदुत्ववादी संघटनाकडून येथील राजकमल चौक येथे सोमवार, ४ जुलै रोजी सकाळी ११वाजता उमेश कोल्हे यांना सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. 

प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा : डॉ. सुनील देशमुख पोलीस व राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे सखोल तपास करून महाराष्ट्र शासनाने सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना लवकरात लवकर कठोरातील कठोर शिक्षा देऊन समाजात एक उदाहरण स्थापित करावे, अशी मागणी माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी केली आहे. त्याचप्रमाणे अमरावती शहरातील सुज्ञ नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी न पडता शहरात शांतता राखावी, असे आवाहनदेखील त्यांनी केली आहे. गुन्ह्यामध्ये सामील असलेले व प्रत्यक्ष खून करणारे हे अत्यंत कमी वयाचे असल्याने सदर गुन्ह्याच्या आडून समाजातील नवयुवकांमध्ये वाढीस लागलेली कट्टर धार्मिक मानसिकता ही अधिक चिंतेची बाब असल्याचे ते म्हणाले.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी