शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

अचलपूर बसस्थानकच झाले भंगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 23:06 IST

जिल्ह्यातील अतिशय महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक लौकिक असलेले अचलपूर शहरातील बसस्थानक भंगार अवस्थेला पोहोचले आहे. विशेष म्हणजे, तालुका मुख्यालय असतानाही प्रवाशांसाठी नव्हे, तर बसस्थानक चोरटे, अवैध धंदेवाले, प्रेमीयुगुल, दारूड्यांसाठी कमालीचे उपयोगी ठरत आहे.

ठळक मुद्देएसटी महामंडळाचे दुर्लक्ष : नागरिकांनी फोडली टिनपत्रे, अवैध धंद्यासाठी जागेचा वापर

आॅनलाईन लोकमतअचलपूर : जिल्ह्यातील अतिशय महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक लौकिक असलेले अचलपूर शहरातील बसस्थानक भंगार अवस्थेला पोहोचले आहे. विशेष म्हणजे, तालुका मुख्यालय असतानाही प्रवाशांसाठी नव्हे, तर बसस्थानक चोरटे, अवैध धंदेवाले, प्रेमीयुगुल, दारूड्यांसाठी कमालीचे उपयोगी ठरत आहे.जवळपास एक लाख लोकवस्ती व ‘अ’ वर्ग नगरपालिकेच्या अचलपूर येथील बसस्थानकात एसटी बसचे दुर्मीळ दर्शन झाले असले तरी गाढव, म्हशी, वराह मोठ्या प्रमाणात येतात. मोकाट जनावरांचा येथे नेहमीच येथे ठिय्या असतो. उघड्यावर शौचासाठीही परिसरातील नागरिक याचा वापर करतात. अनेकांच्या म्हशी बांधलेल्या असतात. शिल्लक भागात लहान मुले क्रिकेटचा आनंद घेतात, तर रात्रीला दारू व जुगाराचा अड्डा या ठिकाणी चालतो. म्हशीचे शेणखताचे ढिगारे या ठिकाणी तयार झाले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना अकारण डासांचा, दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.अचलपूर मतदारसंघाला दोन राज्यमंत्रिपदे लाभली तरी बसस्थानकाकडे कोणीही लक्ष दिले नाही. संपूर्ण राज्यात आपल्या आगळ्यावेगळ्या आंदोलनाकरिता प्रसिद्ध असलेले व १५ वर्षांपासून अचलपूर विधानसभेचे आमदार प्रहारचे बच्चू कडू यांनी अनेक वेळा बसस्थानक सुस्थितीत आणण्याचा प्रयत्न केला. रक्तदान शिबिरे घेतली, आंदोलने केले; परंतु राज्य परिवहन महामंडळाच्या जाचक अटींमुळे बसस्थानक सावरू शकले नाही.जुळ्या शहरांपैकी अचलपूरची मरगळ झटकण्यासाठी हे बसस्थानक पुन्हा भरभराटीस येणे अत्यावश्यक आहे. येथे एसटी बस येणे महत्त्वपूर्ण आहे. मात्र त्यासाठी पुढाकार घेण्यास कोणीही इच्छुक नाही. बाहेरील प्रवासी अचलपुरात येत नसल्यामुळे भांडवल खेळते व्हायला संधी नाही. त्यामुळे अचलपूरचा विकास खुंटला आहे.तत्कालीन राज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विनायकराव कोरडे यांनी ३४ लाख रुपये खर्चून शहराबाहेर बसस्थानक बांधले होते. जुन्या अचलपूरचा विकास होईल, अशी भूमिका त्यामागे होती. काही वर्षे या बसस्थानकाने नागरिकांना सेवा दिली. मात्र, आठ वर्षांपासून या बसस्थानकात हळूहळू एसटी बस येणे बंद झाले. दरम्यान कर्मचारी येथून निघून गेले, तर नळ, पंखे, ट्यूबलाइट, लोखंडी ग्रिल, दरवाजे, टाइल्स, विद्युत वायर चोरट्यांनी काढून नेल्या. या बेवारस वास्तूची देखभाल नसल्यामुळे फरशी, विटासुद्धा चोरट्यांनी काढून नेल्या.या बसस्थानकाच्या जागेवर आदिवासी विद्यार्थी प्रशिक्षण केंद्र बनावे, याकरिता शासनाला प्रस्ताव पाठविला होता. मात्र, शासनाच्या उदासीन धोरणामुळे तो रद्द झाला.- बच्चू कडू, आमदार,अचलपूर मतदारसंघ