शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
2
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
3
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
4
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
5
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
6
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
7
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
8
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
9
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
10
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
11
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
12
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले
13
सौरभची हत्या करणाऱ्या मुस्कान-साहिलने हात जोडले; जेलमध्ये ढसाढसा रडले अन् म्हणाले...
14
आई, वडील आयटी प्रोफेशनल; काळजावर दगड ठेवत अवघ्या तीन वर्षांच्या मुलीला दिला जैन धर्माचा संथारा, कहाणी ऐकून व्हाल भावूक...
15
Gold Rates 2 May : सोन्याच्या किंमतीत जोरदार घसरण, ७८ हजारांपर्यंत येऊ शकतो १० ग्रॅम सोन्याचा दर?
16
अधिकाधिक हिंदू तरुणींवर बलात्कार करण्याचं होतं लक्ष्य, भोपाळ लव्ह जिहाद प्रकरणातील आरोपीचा धक्कादायक दावा 
17
पहलगाम हल्ल्याचा दणका! भारताकडून पाकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता अर्शद नदीम BLOCK!!
18
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर दिल्ली पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
19
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
20
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!

मेळघाटात भंगार एसटी; त्याही अनियमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 23:04 IST

मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्याला जोडणाऱ्या अनेक बसफेऱ्या ऐनवेळी रद्द करण्यासह अनियमित वेळेत धावत असल्याने आदिवासींमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. एसटी महामंडळाचा गलथान कारभार न सुधारल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

ठळक मुद्देआदिवासींमध्ये संताप : आंदोलनाचा इशारा, दळणवळणाची साधने मर्यादित

नरेंद्र जावरे।लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्याला जोडणाऱ्या अनेक बसफेऱ्या ऐनवेळी रद्द करण्यासह अनियमित वेळेत धावत असल्याने आदिवासींमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. एसटी महामंडळाचा गलथान कारभार न सुधारल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.मेळघाटात परतवाडा आगारातर्फे वारंवार भंगार आणि नादुरुस्त बसगाड्या पाठविण्यात येत असल्याचे सर्वश्रुत आहे. मात्र, त्याही आता अनिमित वेळेत किंवा मनात येईल तेव्हा पाठविल्या जात असल्याने आदिवासी प्रवाशांची परवड सुरू आहे. परतवाडा आगारातून टेम्ब्रुसोंडा मार्गे धारणी पाठविण्यात येणारी सकाळी ८:३० वाजताची बस फेरी मनात येईल तेव्हा आगाराच्या मनमानी कारभाराने पाठविण्यात येत आहे. अनियमित धावणाºया या बसफेरीचा फटका तालुक्यातील धारणी येथे उपविभागीय कार्यालयासह आदिवासी प्रकल्प कार्यालयात कामानिमित्त जाणाºया गोरगरीब आदिवासींना बसत आहे. दिवसभर ताटकळत बसूनही एसटी येत नसल्याने निराश मनाने पुन्हा दुसºया दिवशी परतवाडा येऊन धारणी जावे लागत असल्याने आर्थिक फटका व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.परतवाडा आगाराची टेम्ब्रुसोंडा मार्गे धारणीपर्यंत धावणारी ही बस फेरी ३० पेक्षा अधिक आदिवासी पाड्यांना जोडणारी आहे. परसापूर, उपातखेडा, बोराळा, गाडसिम्बा, नागापूर, गौलखेडा बाजार, वडापाटी, तेलखार, धरमडोह, बहाद्दरपूर, चांदपूर, टेम्ब्रुसोंडा, वस्तापूर, कुलंगणा, चिंचखेडा, जामली आर, अंबापाटी, खोंगडा, गिरगुटी, ढाकणा, सावºया, बैराटेकी, बोरीखेडा, गडगामालूर, बिजुधावडी या गावांचा समावेश आहे. या सर्व रस्त्यावरील गावांच्या आदिवासींना ही बसफेरी काम आटपून परत येण्यासाठी योग्य आहे. असे असताना महामंडळाचा हेकेखोरपणा आदिवासींमध्ये संताप व्यक्त करणारा ठरला आहे.धारणी व चिखलदरा तालुक्यात एकूण ३०१ गावे आहेत. त्यातील १५० पेक्षा अधिक गावे अतिशय दुर्गम क्षेत्रात आहेत. ती अद्यापही एसटी किंवा दळवळणाच्या अन्य साधनांनी जोडली गेली नाहीत. आदिवासी बांधव एसटी बस नियमित यावी, यासाठी झगडत असतात. मात्र, प्रशासन त्यांना भाव देत नाही. एका गावातील प्रवासी घेण्यासाठी दुर्गम भागात एसटी न्यायला परवडत नाही, अशी सबब महामंडळाकडून दिली जाते. मात्र, ज्या बसफेºया सुरू आहेत, प्रवासी गाड्या आहेत, त्याही अनियमित असल्याने आदिवासी बांधवांची मोठी कुचंबना होत आहे.स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनंतरही मेळघाटातील अनेक गाव, वाड्या व वस्त्यांमध्ये एसटी पोहोचलेली नाही आणि जेथे पोहोचली, तेथे ती नियमितपणे पाठविली जात नाही. त्याचा दुष्परिणाम आदिवासी रुग्णांच्या आरोग्यावर होत आहे. एसटी नसल्याने आजारी व्यक्तींना वेळेवर उपचार मिळत नाहीत. आजही रुग्णांना परतवाडा व अचलपूर शहरात उपचारासाठी यावे लागते, ही मेळघाटची शोकांतिका आहे.परतवाडा-टेम्ब्रुसोंडा धारणी या मार्गावर धावणारी बसफेरी महामंडळाच्या हेकेखोरपणामुळे मनात येईल तेव्हा पाठविली जाते. त्याचा आदिवासींनाच फटका बसत आहे. याची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा राष्टÑवादी काँग्रेसचे संभुजी खडके यांनी दिला आहे.