शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

शालेय गणवेश निधीला कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 05:01 IST

प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानामार्फत दोन मोफत गणवेश दिले जातात. गणवेश खरेदीसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रत्येकी ५० टक्के निधी मिळतो. मात्र, यंदा कोरोनामुळे शाळा सुरू होण्याबाबत शंकाच आहे. यंदाही मोफत गणवेश वाटपची तयारी करण्यासाठी शिक्षण विभागाने नियोजन सुरू केले आहे. निधी मिळण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देकोरोना इफेक्ट। शालेय व्यवस्थापन समित्यांना निधीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : दरवर्षी समग्र शिक्षा अभियानांतर्गत विविध शाळांतील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येते. मात्र, यंदा शालेय गणवेश निधी कात्रीत अडकले आहेत.डीबीटीऐवजी गणवेश खरेदीचे अधिकार स्थानिक शालेय व्यवस्थापन समितीला देण्यात आले आहे. या समितींना निधीची प्रतीक्षा कायम आहे. शाळा सुरू करण्याबाबत अजूनही संभ्रम असला तरी गणवेशाची रक्कम अदा केली तर किमान दोन महिन्यांत हे गणवेश तयार होतील.प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानामार्फत दोन मोफत गणवेश दिले जातात. गणवेश खरेदीसाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रत्येकी ५० टक्के निधी मिळतो. मात्र, यंदा कोरोनामुळे शाळा सुरू होण्याबाबत शंकाच आहे. यंदाही मोफत गणवेश वाटपची तयारी करण्यासाठी शिक्षण विभागाने नियोजन सुरू केले आहे. निधी मिळण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे कोरोना संकटामुळे अद्याप शाळा सुरू होण्याबाबत निर्णय झालेला नाही. पालक, शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, तरिही जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला गणवेषाचा प्रश्न सोडविता आला नाही. यंदा १५ आॅगस्टवरही कोरोनाचे संकट घोंगावते आहे. त्यापुर्वी गणवेश मिळावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.मार्गदर्शक सूचना जारीशिक्षण विभागाकडून शाळा व्यवस्थापन समित्यासाठी काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेने मागील वर्षीच्या शिल्लक असलेल्या निधीचा वापर करावा. गणवेशाचा रंग प्रकार निवडण्याची जबाबदारी समितीवर सोपविण्यात आली आहे. तसेच ३१ आॅगस्टपूर्वी शाळा व्यवस्थापन समित्यांना उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले आहे.गणवेशाच्या निधीसाठी शासनाकडे मागणी केली आहे. यासाठी निधी मंजूर झाला आहे. मात्र प्रत्यक्षात उपलब्ध झाला नाही. निधी उपलब्ध होताच गणवेश वितरित केल्या जातील.- नितीन उंडे,उपशिक्षणाधिकारी प्राथमिक

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी