शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

शाळा-महाविद्यालये आजपासून सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2022 05:01 IST

कोरोना संसर्ग व ओमायक्रॉनचे संकट कमी होत असल्याने शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, पहिली ते चाैथीपर्यंत ऑफलाईन शिक्षण बंद असणार आहे. परंतु, ऑनलाईन शिक्षणास परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नव्या आदेशानुसार जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, खासगी व्यवस्थापनाच्या पाचवी ते बारावीपर्यंत शाळा, पदवी व पदव्युत्तर ११८ महाविद्यालये कोरोना नियमांचे पालन करून सुरू होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोविड प्रतिबंधक उपाययोजनेच्या अनुषंगाने बंद करण्यात आलेल्या पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा आणि पदवी, पदव्युत्तर महाविद्यालये ७ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी ५ फेब्रुवारी रोजी आदेश जारी केला आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या गर्दीने गजबजणार आहेत. कोरोना संसर्ग व ओमायक्रॉनचे संकट कमी होत असल्याने शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, पहिली ते चाैथीपर्यंत ऑफलाईन शिक्षण बंद असणार आहे. परंतु, ऑनलाईन शिक्षणास परवानगी देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नव्या आदेशानुसार जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय, खासगी व्यवस्थापनाच्या पाचवी ते बारावीपर्यंत शाळा, पदवी व पदव्युत्तर ११८ महाविद्यालये कोरोना नियमांचे पालन करून सुरू होणार आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाचे आदेश निर्गमित झाले आहेत.

कोरोना नियमांचे पालन अनिवार्यकोविड व ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना मास्क,शारीरिक अंतर व गर्दी होणार नाही, याची काळजी शाळांना घ्यावी लागणार आहे. महापालिका क्षेत्र, तसेच ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या शासकीय, निमशासकीय व खासगी शाळांतील इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग ऑफलाईन सुरू होणार आहे. वर्ग खोल्या सॅनिटाईज कराव्या लागतील. जिल्ह्यात २८९७ शाळांची संख्या असून, ४४९२२६ विद्यार्थी संख्या आहे.

सार्वजनिक सुटी जाहीर, सोमवारी शाळा बंदभारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१ चाअधिनियम २६) च्या कलम २५ खाली शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात  आली आहे. त्यामुळे सोमवारी शाळांना सुटी असणार आहे. 

शासनाने शाळा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांसह पालकांच्या आनंदात भर घालणाराच आहे. अनेक दिवसांपासून घरात कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना मनमोकळेपणाने मित्रांसोबत खेळण्या-बागडण्यास मिळणार असल्याने त्यांची कुपित झालेली मानसिकता बदलेल. जीवनशैलीत बदल होऊन त्याच्यातील उत्साह वाढेल.- डॉ. श्रीकांत देशमुख, मानसोपचारतज्ज्ञ

शाळा सुरू करण्याचा निर्णय अतिशय उत्तम आहे. आता कोरोना असो वा कोणतेही संकट, शाळा बंद करणे हा उपाय नाही. विद्यार्थी अभ्यास विसरले आहेत. आता तर शिक्षक शिकवणे विसरतील, हे वास्तव आहे. त्यामुळे नियमित शाळा सुरू करण्याचा निर्णय विद्यार्थी व एकूणच शैक्षणिक क्षेत्राच्या हिताचा आहे. तो अमलात येत असल्याने आनंद होत आहे.  - वैशाली परतेकी, शिक्षिका.

कोरोनाकाळात शाळा बंद करण्याचा निर्णय हा विद्यार्थ्यांसाठी नुकसानदायक ठरला. प्राथमिक शिक्षक संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानाबाबत अवगत केले होते. याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने शाळा सुरू करण्याचा घेतलेला निर्णय चांगला आहे. पहिली ते चौथीचे वर्ग लवकरच सुरू व्हावेत.- योगेश पखाले, शिक्षक

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या