शहरं
Join us  
Trending Stories
1
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
2
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
3
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
4
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
5
ऑपरेशन सिंदूरमधील नामुष्कीनंतर पाकिस्तान सुधरेना, अण्वस्त्रांबाबत रचतोय भयंकर डाव, अमेरिकेच्या अहवालातून गौप्यस्फोट
6
दुसरी मुलगी झाली म्हणून टोमणे; अमरावतीत ‘सीएचओ’ची आत्महत्या
7
व्लादिमीर पुतीन यांच्या हेलिकॉप्टरवर युक्रेनकडून ड्रोन हल्ला, बालंबाल बचावल्याचं वृत्त   
8
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
9
GT चं काही खरं नाही; तळाला असलेल्या CSK च्या बॅटर्संनी केला मोठा धमाका
10
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
11
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
12
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
13
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
14
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
15
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
16
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
17
Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
18
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
19
महिलांसाठी खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये करा गुंतवणूक, बँकांपेक्षाही जास्त व्याज आणि सुरक्षित भविष्य!
20
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...

नऊ तालुक्यांत पोहोचली शालेय पाठ्यपुस्तके

By admin | Updated: May 24, 2015 00:40 IST

जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या २ लाख २१ हजार विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळणार आहेत.

सर्वशिक्षा अभियान : जिल्ह्यातील दोन लाख विद्यार्थ्यांचा समावेशसुरेश सवळे चांदूरबाजारजिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या २ लाख २१ हजार विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. आतापर्यंत नऊ तालुक्यांत पाठ्यपुस्तके पोहोचल्याची माहिती प्राप्त झाली आहे. महाराष्ट्र पाठ्यपुस्तक महामंडळाकडून शिक्षण विभागाला प्राप्त झालेली पुस्तके सर्वशिक्षा अभियानमार्फत नऊ तालुक्यांत पाठविण्यात आली आहेत. जिल्ह्यातील २ लाख २१ हजार विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळावीत म्हणून सर्वशिक्षा अभियानाकडून याबाबत शासनाकडे मागणी करण्यात आली होती. त्यातील काही पाठ्यपुस्तके प्राप्त झाली असून अमरावती, भातकुली, अचलपूर, दर्यापूर, धारणी, अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार, चांदूररेल्वे, चिखलदरा तालुक्यात पाठविण्यात आली आहेत. पुढील सत्रात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेश मिळावा, यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना गणवेशासोबत पाठ्यपुस्तके देण्याचा निर्णयदेखील घेण्यात आला आहे. यापूर्वी शैक्षणिक सत्र आरंभ झाल्यानंतर एक किंवा दोन महिन्यांनंतर तर कधी अर्धे शैक्षणिक सत्र झाल्यानंतर पाठ्यपुस्तके मिळत होती. त्यामुळे अनेक विषयांचा अभ्यासदेखील होत नसल्याची ओरड होत होती. शिक्षण विभागाकडून वेळेवर पुस्तके उपलब्ध होत नसल्याने पालकांना बाजारातून पाठ्यपुस्तके विकत घ्यावी लागत होती. ही परिस्थिती येऊ नये म्हणून यावर्षी शासनाने नियोजित प्रक्रिया सुरू केली आहे. पाठ्यपुस्तके वेळेवर न पोहोचवणाऱ्या कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी सत्रासाठी जिल्ह्याला लवकर पाठ्यपुस्तके उपलब्ध झाली. अन्य तालुक्यात लवकरच पाठ्यपुस्तके मिळणार असल्याची माहिती आहे.