शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

खिरगव्हाण ग्रामपंचायतीकडून मुलींसाठी मुदत ठेवीची योजना, सरपंचांची संकल्पना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2018 13:24 IST

स्त्री जन्माविषयी प्रोत्साहनासाठी एक अभिनव योजना सुरू केली आहे.

अमरावती- स्त्री भ्रूणहत्या थांबविणे व कन्या जन्माला प्रोत्साहन यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून शासनाच्यावतीने अनेक योजना राबविल्या जात असताना समानतेसाठी आपला कुठेतरी हातभार लागावा या दृष्टिकोनातून तालुक्यातील खिरगव्हाण ग्रामपंचायतीच्यावतीने स्त्री जन्माविषयी प्रोत्साहनासाठी शनिवार, १७ फेब्रुवरी २०१८पासून एक अभिनव योजना सुरू केली असून गावात मुलगी जन्माला आली तर तिच्या नावाने ग्रामपंचायत दोन हजार रुपयांचे फिक्स डिपॉझिट करणार, शिवाय आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलीच्या नावानेसुद्धा दोन हजार रुपये जमा करणार आहे. सरपंच पुरुषोत्तम घोगरे यांच्या संकल्पनेतून ही अभिनव योजना सुरू करण्यात आली असून, सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. 

तालुक्यातील खिरगवहाण (समशेरपूर) ग्रामपंचायत एक हजार लोकसंख्या वस्तीचे छोटेसे गाव आहे. वर्षभरापूर्वी येथे थेट जनतेतून निवडून आलेले युवा सरपंच पुरुषोत्तम घोगरे विराजमान झाले. युवा व कल्पक वृत्तीचे असल्याने त्यांनी गावाच्या कायापालट करण्याचा संकल्प केला व प्रथम शिक्षणाला प्राधान्य देऊन कार्य सुरू केले. गावात असलेल्या जिल्हा परिषद शाळेची अवस्था सुधारली व स्वच्छ महाराष्ट्र अभियानाल सहभागी होऊन संपूर्ण गाव स्वरुप केले. गाव पूर्णपणे हगणदारीमुक्त होऊन हगणदारीच्या परिसरात बगीचाचे सुशोभीकरण व संत गाडगेबाबांचे स्मारक उद्यान तयार झाल्याने येथे एकेकाळी शौचाय जायचे आज त्याच भागात लोकांनी डबे पार्टी करावे, असे परिवर्तन घडले.

आज ग्रामपंचायतच्या वतीने स्त्रीजन्म प्रोत्साहनला चालणा देणारी अभिनव योजना सुरू करण्यात आली असून, महाराजांना व पहिल्या उपक्रम असावा, गावात मुलगी जन्माला आल्यास तिच्या नावे २ हजार रुपये फिक्स डिपॉझिट करण्यात येणार. शिवाय गावातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलीच्या नावानेसुद्धा दोन हजार रुपये भरणार. आज शनिवारी सरपंच पुरुषोत्तम घोगरे यांनी ग्रामसेवक इतर सदस्य पोलीसपाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या सहकार्याने  वासियांसमोर या उपक्रमाची घोषणा केली. याचे तालुक्यातील सर्व स्तरातून स्वागत होत असून, ग्रामपंचायतवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

आज स्त्री पुरुष सामाजिक असमतोल बघता भविष्यातील चित्र भयावह आहे. त्यामुळे या समानतेसाठी आपला कुठेतरी हातभार लागलावा, यादृष्टिकोणातून या उपक्रमाचे पावलं उचलली असून गावकऱ्यांच्या साथीने निश्चितच याला क्रांतीचे रुप येईल. या संकल्पनेचा झालेला ठराव घेतला असून, माझ्या सहकारी सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या सहकार्याने या योजनेचा प्रारंभ केला असे सरपंच पुरुषोत्तम घोगरे यांनी सांगितले.