शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

टंचाईने ग्रामीण भागाच्या तोंडचे पाणीच पळवले!

By जितेंद्र दखने | Updated: June 7, 2024 20:52 IST

१३ गावांत १७ टँकर, ८३ ठिकाणी ३७ बोअरवेल, ६३ विहिरींचे अधिग्रहण

अमरावती : मेअखेरीस आणि जून महिन्याच्या प्रारंभी जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईची दाहकता वाढली असून, १४ पैकी ११ तालुक्यांत टंचाईची तीव्रता अधिक असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सूर्य आग ओकत असल्याने पाण्याचे स्रोत आटल्याने पाणीटंचाईची दाहकता वाढली आहे. यामुळे जिल्ह्यातील १३ गावांत १७ खासगी टँकरद्वारे तर ८३ गावांमध्ये ३७ बोअरवेल व ६३ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामुळे २५ हजारांवर नागरिकांना खासगी टँकर व खासगी अधिग्रहित विहिरींद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून आहेत. 

जिल्ह्यात सूर्य आग ओकत असल्याने पाण्याचे स्त्रोत आटल्याने पाणी टंचाईची दाहकता वाढली आहे. यामुळे जिल्ह्यातील ९६ गावांतील जवळपास ४० हजार नागरिकांना खासगी टँकर व खासगी बोअरवेल आणि अधिग्रहित विहिरींद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून आहेत. परिणामी पाण्यासाठी हजारो ग्रामस्थांना प्रामुख्याने गृहिणींना भटकंती करावी लागत आहे. जिल्ह्यातील दाेन तालुक्यांतील १३ गावांना १७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर, चिखलदरा तालुक्यातील बेला सलोना, मोथा, खडीमल, धरमडोह, आकी, बहादरपूर, गौलखेडा बाजार, आलाडोह, लवादा, गवळीढाणा कोरडा, स्कुलढाणा, कालापांढरी आदी गावांमध्ये १७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. दुसरीकडे १४ पैकी ११ तालुक्यांतील ८३ गावांची तहान ६३ अधिग्रहित विहिरी आणि ३७ बोअरवेलवरून भागविली जात आहे. तालुका- गावे- बोअरवेल, विहीर संख्याअमरावती-१०-०५-०७तिवसा-०७-०१-०५भातकुली-०१-००-०१चांदूर रेल्वे-०३-००-०३धामणगाव रेल्वे-०२-००-०२नांदगाव खंडेश्र्वर-१७-००-१८अचलपूर-०३-०७-०३मोर्शी-१४-०४-१२वरूड-०२-००-०२धारणी-०८-०६-०४चिखलदरा-१६-१४-०६ पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता टंचाई आराखड्यानुसार वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनात टंचाई निवारणार्थ विविध उपाययोजना तातडीने केल्या जात आहेत. सध्या १३ गावांत १७ टँकरद्वारे तर ८३ गावांमध्ये ३७ बोअरवेल व ६३ विहीर अधिग्रहणाद्वारे नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. टंचाईच्या अनुषंगाने पाणीपुरवठा विभागामार्फत मागणीनुसार तातडीने उपाययोजना केल्या जात आहेत.- सुनील जाधव, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग 

टॅग्स :Amravatiअमरावती