शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

एसबीआय खातेदारांची गोपनीय माहिती लीक?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 23:39 IST

एक-एक पैसा जुळवून बँकेत जमा करणाºया नागरिकांच्या खात्यातून परस्पर पैसे काढून घेतले जात असल्याच्या पाच घटना शहरात उघड झाल्या आहेत.

ठळक मुद्देखातेदारांचा आरोप : आतापर्यंतच्या पाच घटनांत चार लाखांची रोख गायब

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : एक-एक पैसा जुळवून बँकेत जमा करणाºया नागरिकांच्या खात्यातून परस्पर पैसे काढून घेतले जात असल्याच्या पाच घटना शहरात उघड झाल्या आहेत. खात्याची माहिती केवळ बँक व खातेदारांशिवाय अन्य कोणालाही नसते. असे असताना खात्यातून परस्पर पैसे काढले जातात तरी कसे, असा प्रश्न खातेदारांना पडला आहे. एसबीआयकडून गोपनीय माहिती लीक होत असल्याचा आरोप खातेदारांनी केला आहे.चंदननगरातील रहिवासी गोपाल विनायक इंगळे यांच्या बँक खात्यातून २७ सप्टेंबर रोजीपर्यंत १ लाख २७ हजारांची रोख लंपास झाली. त्यानंतर कोतवाली, राजापेठ ठाण्याच्या हद्दीत दोन घटनांमध्ये एसबीआय खातेदारांचे पैसे खात्यातून लंपास झाले. गाडगेनगर ठाण्यातही तक्रारींचा ओघ सुरु झाला आहे. एका महिला पोलिसाच्या खात्यातून पैसे चोरी गेले. सोमवारी पुन्हा दोन घटना गाडगेनगरच्या एसबीआय शाखेतील खातेदारांसोबत घडल्या. एका महिलेच्या खात्यातून १ लाख २० हजार व संतोष नामक तरुणाच्या खात्यातून २३ हजारांची रोख लंपास झाली. फोनवरून एटीएमचा पासवर्ड वा ओटीपी क्रमांक मागितला नसतानाही बँक खात्यातून रोख काढल्याचा हा प्रकार खातेदारांना संभ्रमित आहे. काही खातेदार गाडगेनगरातील बँकेकडे व्यथा मांडण्यास गेले असता याबाबत बँक अधिकारी अनभिज्ञ असल्याचे आढळून आले. या पैशांची हेराफेरी करणाºयांचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र, अद्याप त्यांचे हात आरोपींपर्यंत पोहोचले नाहीत. या घटनांमुळे खातेदारांचा बँकेवरील विश्वास उडाल्याचे दिसून येत आहे.खातेदारासोबत घडलेले किस्सेगोपाल इंगळे इंजिनिअर असून, ते एसबीआयचे खातेदार आहेत. त्यांच्या खात्यातून १ लाख २७ हजार लंपास झाले. याबाबत त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. रविवारी पुन्हा त्यांच्या बँक खात्यातून २३ हजारांची रोख वळती झाल्याचा एक संदेश प्राप्त झाला. नेमका प्रकार जाणून घेण्यासाठी ते गाडगेनगरच्या एसबीआय शाखेत गेले. त्याठिकाणी आधीच संतोष नामक तरुण २३ हजार खात्यातून गेल्याची ओरड करीत होता. संतोषच्या खात्यातील २३ हजार गोपाल इंगळेच्या खात्यात वळते झाल्याचे विवरण बँकेकडे होते. मात्र, गोपालच्या खात्यातून २३ हजारांची रोख गुडगाव (हरियाणा) येथून काढल्याचा संदेश गोपालला आला.मानसिक त्रासाने खातेदार हैराणएसबीआयच्या खातेदारांसोबत घडलेले हे प्रकार आश्चर्यचकित करणारे आहे. परिश्रमातून कमावलेला पैसा बँकेतही सुरक्षित नसल्याचा धक्का खातेदारांना वेदना देत असतानाच कुुटुंबात कलह सुरू झाले आहेत. गाडगेनगर हद्दीत एका महिलेच्या खात्यातून रक्कम परस्पर वळती केली गेली. पती पैशांचा हिशेब विचारेल आणि मारसुद्धा खावा लागेल, अशी भीती या महिलेला आहे. त्यातच खातेदारांना नियमित कामे सोडून बँक व पोलीस ठाण्यात चकरा घालाव्या लागत आहेत. काय करावे अन् काय नाही, अशी खातेदारांची स्थिती झाली असून ग्राहकांच्या पैशाबाबत एसबीआयचे नियंत्रण व सुरक्षितता काय, असा प्रश्न खातेदारांनी उपस्थित केला आहे.