‘वो सिर्फ मेरी है’ म्हणत मित्राच्या गळ्यावर वार! प्रेमाचा त्रिकोण; नेलकटरचा वापर, प्रेयसीसह तिघेही विशीत, गु्न्हा दाखल

By प्रदीप भाकरे | Published: January 5, 2023 07:43 PM2023-01-05T19:43:32+5:302023-01-05T19:43:43+5:30

ती माझी क्रश आहे, हे माहित असतानाही तू तिच्यावर प्रेमाचे जाळे का टाकतो आहेस, तिचा पाठलाग बंद कर, असे बजावत मित्रानेच मित्राच्या गळ्यावर वार केल्याची खळबळजनक घटना येथे घडली.

Saying 'wo sirf meri hai', stab a friend's neck! the love triangle; Use of nail cutter, all three with girlfriend in twenties, crime filed | ‘वो सिर्फ मेरी है’ म्हणत मित्राच्या गळ्यावर वार! प्रेमाचा त्रिकोण; नेलकटरचा वापर, प्रेयसीसह तिघेही विशीत, गु्न्हा दाखल

‘वो सिर्फ मेरी है’ म्हणत मित्राच्या गळ्यावर वार! प्रेमाचा त्रिकोण; नेलकटरचा वापर, प्रेयसीसह तिघेही विशीत, गु्न्हा दाखल

Next

अमरावती: ती माझी क्रश आहे, हे माहित असतानाही तू तिच्यावर प्रेमाचे जाळे का टाकतो आहेस, तिचा पाठलाग बंद कर, असे बजावत मित्रानेच मित्राच्या गळ्यावर वार केल्याची खळबळजनक घटना येथे घडली. ५ जानेवारी रोजी दुपारी १२ च्या सुमारास एका बारनजिक घडलेल्या या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी ‘वो सिर्फ मेरी है’ म्हणत मित्राच्या गळ्यावर वार करणाऱ्यास अटक केली. रूद्वेश (२०) असे जखमीचे नाव आहे. तर, हर्ष (२०) असे आरोपीचे नाव आहे.
 

तक्रारीनुसार, हर्ष, रूद्रेश व जिच्यासाठी रूद्रेशच्या गळा कापला गेला, ती मुलगी असे तिघेही शाळकरी वयापासून परस्परांचे मित्र आहेत. माध्यमिक शिक्षण त्यांनी एकाच शाळेत घेतले. मात्र अलिकडे, तिघेही उच्चशिक्षणासाठी वेगवेगळ्या महाविद्यालयात आहेत. हर्ष व ती मुलगी गेल्या काही वर्षांपासून परस्परांच्या प्रेमात आहेत. त्याबाबत रूद्वेशला देखील माहिती होती. हर्ष तिच्याबाबत अधिक ‘पझेसिव्ह’ होता. ती आपलीच, तिने कुणाशी बोलू नये, असाही त्याचा हेका. मात्र, अलिकडे रूद्वेश देखील ‘बचपण’ का प्यार’ कडे वळला. तिचा पाठलाग करू लागला. तिच्याशी बोलणे व्हावे, ती दिसावी, म्हणून तो तिच्या घराकडे देखील चकरा मारायचा. ती बाब तिच्या लक्षात आली. रूद्वेश हा आपला पाठलाग करत असल्याचे तिने हर्षला सांगितले. ते ऐकून हर्षचा अंगाचा तिळपापड झाला.

ये, तुझ्याशी बोलायचे आहे

तुझ्याशी बोलायचे आहे, तू कैलास बारजवळ ये, असा फोन कॉल हर्षने रूद्वेशला केला. आठवीपासूनचा मित्र असल्याने रूद्वेशला कुठलिही शंका आली नाही. ५ जानेवारी रोजी दुपारी रूद्वेश हा त्या बारजवळ पोहोचला. थेट विषयाला हात घालत हर्षनी रूद्वेशला जाब विचारला. तुला माहित असताना तू असे करूच कसा शकतो, असा प्रश्नांचा भडीमार त्याने केला. दोघांमध्ये चांगलीच तू तू मै मै झाली. अशातच, हर्षने नेलकटरने त्याच्या गळयावर वार केला. त्यामुळे तो रक्तबंबाळ झाला. वाहतूक शिपाई मनीष सहारे व राहूल ढेंगेकर हे तेथून जात असताना त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने राजापेठ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आरोपी हर्षला ताब्यात घेतले. तर रूद्वेशला इर्विनमध्ये हलविले.

प्रथमदर्शनी प्रेमाच्या त्रिकोणातून ती घटना घडली. फिर्यादी व आरोपींसह ती मुलगी देखील परस्परांना ओळखते. गुन्हा दाखल करण्यात आला.
मनीष ठाकरे, ठाणेदार, राजापेठ

Web Title: Saying 'wo sirf meri hai', stab a friend's neck! the love triangle; Use of nail cutter, all three with girlfriend in twenties, crime filed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.