शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

सासरी खूप सोसलं, आता माहेरी चाललोय !

By admin | Updated: February 24, 2016 00:19 IST

‘सासरी खूप छळ झाला.. खूप सोसलं..आता सासूरवास संपवून माहेरी चाललोय’, अशा शब्दांत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे मावळते कुलगुरू मोहन खेडकर यांनी

मोहन खेडकर : आता तरी शेलक्या विशेषणांनी संबोधू नकाप्रदीप भाकरे अमरावती‘सासरी खूप छळ झाला.. खूप सोसलं..आता सासूरवास संपवून माहेरी चाललोय’, अशा शब्दांत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे मावळते कुलगुरू मोहन खेडकर यांनी त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळातील एकूण घडामोडींवर 'लोकमत'ला मंगळवारी बोलकी प्रतिक्रिया दिली.एरवी कोणत्याही आरोप-प्रत्यारोपांवर, कोणत्याही प्रकरणात कधीच आक्रमक होऊन ‘कमेंट’ न देणारे कुलगुरू कार्यकाळ संपवून निघताना मात्र भरभरून बोललेत. आतापर्यंत दाटलेले सारे मळभ त्यांनी मोकळे केले. ते म्हणाले, माझ्या कार्यकाळात अनेक आंदोलने झालीत, शेकडो आरोप झालेत. मात्र, मी स्थितप्रज्ञ राहिलो. कारण, माझा माझ्या कामावर विश्वास होता. आपल्या कार्यकाळात सर्वात जास्त आंदोलने झालीत. आरोपही सर्वाधिक आपल्यावरच झालेत? या प्रश्नाच्या उत्तरादाखल ते म्हणाले, असे असेलही कदाचित. पण, यापूर्वी विद्यापीठाला ‘अ’ मानांकनसुद्धा मिळाले नाही, हे वास्तव आहे ना, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. मंगळवारी खेडकरांना निरोप देण्यात आला. तत्पूर्वी ते ‘लोकमत’शी भरभरुन बोलले. ‘अ’ मानांकनामुळे १०० - १५० कोटींचे अनुदान विद्यापीठाला मिळेल. त्याचा लाभ निश्चितच विद्यार्थ्यांना होईल, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. कुलगुरुपदाच्या खुर्चीवर बसताना काही गोष्टी अपेक्षित होत्या. मात्र, मला त्यापलीकडे सहन करावे लागले. त्यावर मात करीत ‘अ’ मानांकन मिळविणे, हीच माझ्या स्थितप्रज्ञतेची आणि कार्यकर्तृत्वाची पावती नाही का? मात्र, तसे लिहितानाही कंजूषपणा केला जातो. आता तरी मृणाल खेडकर गुणवाढ प्रकरण, बांधाबांध भत्ता, सक्तीची रजा ही विशेषणे मागे टाकून ‘अ’ श्रेणीने गौरवान्वित अमरावती विद्यापीठ असा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा उल्लेख व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यापीठाची बदनामी कशासाठी?मोहन खेडकरांना ‘टार्गेट’ करून आंदोलने करण्यात आलीत. बदनामी कुणाची, विद्यापीठाचीच ना? विद्यापीठ कुणाचे? मी तर चाललोय.. मग विद्यापीठाची बदनामी कशासाठी? याचा विचार व्हायला हवा, अशी अपेक्षा खेडकरांनी व्यक्त केली. पाच वर्षांत आपण कधीही ‘डीए’ घेतला नाही. दोनदा स्वखर्चाने परदेशात गेलो. मात्र, ही बाजू समोरच आली नाही, असे स्पष्ट करून शेलक्या विशेषणांनी आता तरी विद्यापीठाला हिणवू नका, असे आर्जव त्यांनी केले. ‘मोस्ट शेमफुल डे इन माय लाईफ’कुलगुरुंच्या कार्यालयात एखाद्या विद्यार्थी संघटनेने आंदोलने करावीत; तथापि माझ्या कुटुंबीयांसमोर आणि पोलिसांच्या उपस्थितीत एखाद्या विद्यार्थी नेत्याने शासकीय निवास्थानात घुसखोरी करण्याचा प्रसंग अत्यंत लाजिरवाणा आहे. ही बाब विचारशील समाजासाठी प्रश्नचिन्ह आहे. तसेच इट ईज ‘मोस्ट शेमफुल डे इन माय लाईफ’ असे ते खेदाने म्हणाले.नागपूर हे माहेर !पाच वर्षांपूर्वी नागपूर येथील व्हीएनआयटीमधून मोहन खेडकर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कुलगुरू म्हणून रुजू झाले होते. ते मंगळवारी रात्री नागपूरसाठी रवाना होणार आहेत. सासरी खूप सोसलंय. आता परत माहेरी चाललोय. कुठलीही खंत नाही, अशा भावना व्यक्त करीत कुलगुरू कक्षाच्या बाहेर पडले. लवकरच ते व्हीएनआयटीतील इलेक्ट्रीकल विभागात ‘प्रोफेसर’ म्हणून रुजू होणार आहेत.