लोकमत चमू अमरावतीरविवारी सकाळपासून जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसाळा संपता-संपता पावसाचे हे पुनरागमन खरीप पिकांसाठी नुकसानदायक ठरू शकते. जमिनींची पाणी शोषण क्षमता संपल्याने पिकांवर विपरीत परिणाम संभवतो. गणेश विसर्जनाच्या ऐनवेळी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे भक्तांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अप्परवर्धा धरणाचे पाच दरवाजे ४५ से.मी.ने उघडण्यात आले असून ३६२ दलघमी प्रती सेकंदनुसार पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शहानूरचे दोन, चंद्रभागेचे तीन व पूर्णा प्रकल्पाचे २, बगाजी सागर धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत. मोर्शीत दमयंती नदीला आलेल्या पूरामध्ये एक इसम वाहून गेला. नदी-नाल्यांना पूर आल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला.
संततधार, धरणे फुल्ल
By admin | Updated: September 8, 2014 00:54 IST