शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
3
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
4
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
5
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
6
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
7
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
8
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
9
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
10
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
11
बाजारात गेलेल्या सुनेचा २ वर्षांनी विहिरीत सापडला सांगाडा; राँग नंबरवरुन सुरू झालेली लव्हस्टोरी
12
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
13
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
14
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
17
Viral Video: मुंबई लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स
18
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
19
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
20
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम

रिमझिम पावसाने पिकांना संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 21:55 IST

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात हलका व मध्यम स्वरूपाचा होत असलेला पाऊस पिकांना पोषक आहे. काही तालुक्यात उशिराने पेरणी झाल्या. या पेरणीचा मेळदेखील साधला गेल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

ठळक मुद्देरविवारपासून सार्वत्रिक : महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांचा मात्र दगा, दुबार पेरणीचे सावट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात हलका व मध्यम स्वरूपाचा होत असलेला पाऊस पिकांना पोषक आहे. काही तालुक्यात उशिराने पेरणी झाल्या. या पेरणीचा मेळदेखील साधला गेल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र, काही भागात महाबीजच्या सोयाबीन बियाण्याची उगवण कमी झाल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे.यंदाच्या खरिपामध्ये जिल्ह्यात ७.२८ लाख हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यापैकी सहा लाख हेक्टरमध्ये सद्यस्थितीत पेरणी झाली. यंदा रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेल्यामुळे शेतकºयांची मदार आर्द्रावर होती. या नक्षत्राचा पहिला आठवडा कोरडाच गेल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या होत्या. नंतर मात्र समाधानकारक पाऊस झाल्याने दोन आठवड्यापासून जिल्ह्यात पेरण्यांचा वेग वाढला. सद्यस्थितीत जिल्ह्यात ८० टक्क्यांवर क्षेत्रात खरिपाची पेरणी झालेली आहे.जिल्ह्यात १ जून ते ७ जुलै या कालावधीत २०८ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात २२६.३ मिमी पाऊस पडला. सद्यस्थितीत जिल्ह्यात पावसाने सरासरी पार केलेली आहे. हा पाऊस ११७ टक्के आहे. मागील वर्षी याच तारखेला फक्त १०८ मिमी पाऊस पडला होता.वार्षिक सरासरीच्या तुलनेत सध्या २८ टक्के पाऊस पडला आहे. यामध्ये सर्वाधिक २६० मिमी पाऊस चांदूर रेल्वे तालुक्यात झाला असून, सर्वात कमी १७२ मिमी पाऊस धारणी तालुक्यात कोसळला आहे.नांदगाव खंडेश्वरला सर्वाधिक पाऊसजिल्ह्यात सद्यस्थितीत २२६ मिमी पाऊस पडला. यामध्ये सर्वाधिक २८८ मिमी पाऊस नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पडला. अमरावती २१६ मिमी, बुलडाणा १८२ मिमी, चांदूर रेल्वे २६० मिमी, धामणगाव रेल्वे २३१ मिमी, तिवसा १९५ मिमी, मोर्शी २२३ मिमी, वरूड २४६ मिमी, अचलपूर २६९ मिमी, चांदूर बाजार २०७ मिमी, दर्यापूर २३६ मिमी, अंजनगाव सुर्जी २०९ मिमी, धारणी १७२ मिमी व चिखलदरा तालुक्यात २३१ मिमी पाऊस पडला.काही भागात सोयाबीनची दुबार पेरणीगतवर्षी बोंडअळीच्या नुकसानामुळे यंदा शेतकऱ्यांचा कल सोयाबीनकडे अधिक आहे. मात्र, अचलपूर, भातकुलीसह काही तालुक्यांमध्ये महाबीजच्या सोयाबीन बियाण्याची उगवण कमी झाल्याने शेतकºयांवर दुबार पेरणीची वेळ आली. याबाबत शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. पावसाला उशिरा सुरवात झाल्यामुळे ६० दिवसांच्या कालावधीतील मूग, उडिदाचे बहुतांश क्षेत्र बाद होऊन सोयाबीनमध्ये रूपांतरित झाल्याने यंदा सोयाबीनची क्षेत्रवाढ होणार आहे.हवामानाची सद्यस्थितीवायव्य बंगालचा उपसागर आणि लगतच्या ओरिसा किनारपट्टीवर असलेल्या चक्राकार वाऱ्याच्या प्रभावामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. संबंधित चक्राकार वारे ७.५ किमी उंचीवर तयार होऊन ते दक्षिणेकडे झुकल्याने दक्षिण व लगतच्या मध्य भारतात बहुतेक ठिकाणी मध्यम ते भारी पाऊस पडत आहेत. पश्चिम किनारपट्टीवर असलेली टर्फ रेषा मजबूत होण्याची शक्यता आहे. मान्सून सक्रिय होण्याची स्थिती पाहता, तीन दिवस मध्य भारतात पाऊस कायम राहणार असल्याचे हवामानतज्ज्ञ अनिल बंड यांनी सांगितले.