शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

संजय उदापूरकर क्रिकेट सट्ट्याचा मुख्य बुकी

By admin | Updated: May 16, 2017 00:03 IST

क्रिकेट सट्टा चालविणाऱ्या तिघांना अंजनगाव सुर्जी पोलिसांनी अटक केली होती. यातील अरोपींनी कबुली जबाब दिला आहे.

कबुली जबाब : अंजनगावातील बड्यांचा समावेश सुदेश मोरे । लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : क्रिकेट सट्टा चालविणाऱ्या तिघांना अंजनगाव सुर्जी पोलिसांनी अटक केली होती. यातील अरोपींनी कबुली जबाब दिला आहे. या क्रिकेट सट्याचा मुख्य सूत्रधार परतवाडा येथील कुख्यात बुकी संजय उदापूरकर हा आहे. मात्र, अटकेच्या भीतीने पसार झाला आहे. अंजनगाव पोलीस त्याचा शोध घेत आहे. संजय उदापूरकर यास अटक केल्यास क्रिकेट सट्टा चालविणारी अनेक बडी नावे समोर येतील, असा अंदाज पोलिसांना आहे.दरम्यान कबुली जबाब दिल्यावर अटकेतील आरोपी अनूप आंबेकर, संतोष देशमुख व राहुल कंळबे यांना जामीन मंजूर क रण्यात आला आहे. हे तिनही आरोपी क्रिकेट सट्याचा सूत्रधार संजय उदापुरकरचे एजंट म्हणून काम करीत होते.क्रिकेट सट्ट्यामधील एजंटनी दिलेल्या कबुली जबाबनंतर संजय उदापुरकरचा शोध घेण्यासाठी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी विशेष पथक तयार केले. त्याच्या अटकेसाठी परतवाडा येथील घरी धाड टाकण्यात आली होती. मात्र, आपल्या एजंटना अटक झाल्याची माहिती मिळताच त्यांनी परतवाडा येथून पलायन केले. जिल्हाभर संजय उदापूरकर याचे जाळे पसरले असल्याची शक्यता पोलिसांना असून त्या दिशेने तपास केला जात आहे. शुक्रवारी रात्री माहितीच्या आधारावर स्थानिक सावकारपुरा भागात घाड टाकून आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा चालविणाऱ्या तिघांना अटक करून त्यांच्याकडून साडेतीन लाख नगदी व मुद्देमाल यासह सुमारे साडेचार लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला होता. याप्रकरणी अनूप आंबेकर, संतोष देशमुख व राहुल कंळबे यांना अटक करण्यात आली होती. पोलिसांनी चौकशी केल्यावर अनेक प्रतिष्ठित व्यक्ती सट्टा लावत असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. पोलिसांना कुणी किती रुपयांचा सट्टा लावला व पैशांची देवाण घेवाण कशी करावी, याची माहिती असलेला टेप मिळाला आहे. हा भक्कम पुरावा मानला जात आहे. या प्रकरणातील संभावित आरोपी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी प्रयत्नात असतील, असा अंदाज पोलिसांना आहे. त्या आधारावर पुढील हालचाली ठरतील, असे मानले जात आहे.झटपट श्रीमंत होण्यासाठीया प्रकरणातील आरोपी सराईत गुन्हेगार नाहीत. पण झटपट श्रीमंत होण्याच्या प्रयत्नातून त्यांनी हा प्रकार केला आहे. ही घटना शहरातील मध्यवर्ती व प्रतिष्ठित लोकांची वस्ती असलेल्या भागात घडली असल्याने याची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. सर्व आरोपी तरुण असल्याने त्यांना आमीष दाखवून हे काम करण्यात आले असावे, असाही अंदाज आहे. अटक केलेल्या आरोपींनी दिलेल्या कबुली जबाबाच्या आधारावर याचा सूत्रधार संजय उदापूरकर हा आहे. त्याने पलायन केले असून आम्ही यांचा शोध घेत आहोत. त्याला अटक केल्यावर क्रिकेट सट्ट्याच्या जाळ्याची अधिक माहिती मिळेल. - सुधीर पाटील, ठाणेदार