शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

संजय नरवणे नवे महापौर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2017 00:02 IST

महापालिकेत ४५ सदस्यीय ‘टीम भाजप’चा चेहरा म्हणून संजय सातप्पा नरवणे यांची निवड करण्यात आली आहे.

भाजपक्षाचा निर्णय : संध्या टिकलेंकडे उपमहापौरपद, ९ मार्चला औपचारिक निवडअमरावती : महापालिकेत ४५ सदस्यीय ‘टीम भाजप’चा चेहरा म्हणून संजय सातप्पा नरवणे यांची निवड करण्यात आली आहे. भाजपच्या कोअर कमिटीने नरवणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असून ते महापालिकेचे १५ वे महापौर ठरतील. नरवणे यांची महापौरपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाली असली तरी ९ मार्चला महापालिका सभागृहात होणाऱ्या विशेष सभेत त्यांची अधिकृतरीत्या निवड होईल. ८७ सदस्यीय सभागृहात भाजपकडे सर्वाधिक ४५, काँग्रेसकडे १५, एमआयएमचे १०, बसपाचे ५, शिवसेनेचे ७, स्वाभिमानचे ३ व २ अपक्ष सदस्य आहेत. भाजपला पूर्ण बहुमत मिळाल्याने सत्तेची सर्व पदे त्यांच्याकडे जाण्याची औपचारिकता पाहता महापौरपदी कुणाची वर्णी लागते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. रविवारी सकाळी ११.३० ते ५.३० या कालावधीत महापौर - उपमहापौर पदासाठी नामांकन दाखल करावयाचे असल्याने भाजप अंतर्गत गोटात बैठकांना जोर आला होता. शनिवारी उशिरापर्यंत भाजपची विश्रामगृहात मॅरेथॉन बैठक चालली. नवनियुक्त ४५ सदस्यांशी सल्ला मसलत करून महापौर, उपमहापौर, सभागृह नेता व स्थायी समिती सभापतीपदी कोण, यावर मंथन करण्यात आले. महापौरपद एससीसाठी राखीव असल्याने १० पैकी कोण, असा प्रश्न भाजपमध्ये उपस्थित झाला होता. चर्चेची गुऱ्हाळे रंगल्यानंतर कोअर कमिटीने रविवारी महापौरांसह अन्य नावे निश्चित केली. भाजपचे आ. चैनसुख संचेती, आ. सुनील देशमुख, प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी, किरण पातुरकर, रवींद्र खांडेकर, शहराध्यक्ष जयंत डेहनकर आदींनी रविवारी सकाळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली. त्यानुसार प्रभाग क्र. ६ अ. विलासनगर-मोरबाग येथून निवडून आलेले संजय नरवणे हे आता अमरावतीचे प्रथम नागरिक अर्थात महापौर असतील. काँगे्रसच्या शोभा शिंदे यांनी महापौरपदासाठी नामांकन दाखल केल्याने ९ मार्चकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.भाजप, काँग्रेस, एमआयएमकडून नामांक न दाखल अमरावती : रविवारी सकाळी ११.३० ते ५,३० या कालावधीत महापौर आणि उपमहापौरपदासाठी नामांकन स्वीकारले गेले. महापौरपदासाठी भाजपकडून संजय नरवणे यांनी दोन अर्ज दाखल केलेत. काँग्रेसच्या शोभा शिंदे यांनी महापौरपदासाठी नामांकन दाखल केले. याशिवाय उपमहापौरपदासाठी भाजपच्या संध्या टिकले यांनी दोन नामांकन दाखल केलेत. काँग्रेसकडून अब्दुल वसीम मजीद आणि एमआयएमकडून अफजल हुसेन मुबारक हुसेन यांनी अर्ज दाखल केला. महापौर आणि उपमहापौरपदासाठी अर्ज भरताना भाजपने शक्तीप्रदर्शन केले. भाजपचे सर्वच स्थानिक नेते आणि नवनियुक्त नगरसेवक यावेळी उपस्थित होते.पडद्यामागे हालचालीमहापौरपदासाठी भाजपमध्ये संजय नरवणे आणि राधा कुरील यांच्यात चांगलीच रस्सीखेच झाली. राधा कुरील आक्रमक आणि अनुभवी असल्याचे आग्रहपूर्वक सांगण्यात आले. महापौरपदाचा तराजू अनेकदा त्यांच्याकडे झुकला. मात्र सरतेशेवटी संजय नरवणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. अजय गोंडाणे, विजय वानखडे यांचीही नावे स्पर्धेत होती.काळेंचे सभागृहनेतेपद आश्चर्यकारक राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून ऐन निवडणुकीच्या वेळी भाजपात डेरेदाखल झालेल्या सुनील काळे यांची सभागृह नेतेपदी झालेली निवड आश्चर्यकारक ठरली आहे. सभागृह नेतेपदासाठी चर्चेत असलेल्या विवेक कलोती यांच्याकडे भाजपने उपगटनेतेपद दिले आहे. काळे हे सूतगिरणी तर कलोती जवाहरगेट बुधवारा प्रभागातून निवडून आले आहे. उपमहापौर महिलेकडेज्येष्ठ नगरसेविका संध्या टिकले यांच्यावर उपमहापौरपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली . मेघा हरणे यांच्यानंतर त्या दुसऱ्या महिला उपमहापौर असतील. पाच वर्षांनंतर टिकले या भाजपच्या उमेदवारीवर बेनोडा - भीमटेकडी - दस्तुरनगर प्रभाग क्र. १० क मधून निवडून आल्या आहेत. त्या भाजपच्या कट्टर अनुयायी आहेत.स्टँडिंग भारतीयांकडेअपेक्षेप्रमाणे तुषार भारतीय स्थायी समितीचे नवे सभापती असतील. मावळत्या पंचवार्षिकमध्येसुद्धा ते स्थायी समितीचे सदस्य होते. प्रभाग क्र. १९ ड साईनगरमधून भारतीय सर्वाधिक मताने विजयी होवून दुसऱ्यांदा सभागृहात पोहोचलेत. याशिवाय भारतीय हे माजी शहर जिल्हाध्यक्ष असून त्यांनी बडनेरा विधानसभाही लढविली आहे.पार्लमेंट्री बोर्डच्या बैठकीत संभाव्य नावांवर चर्चा करण्यात आली. सर्वांची मते जाणून घेण्यात आली. प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांनी हिरवी झेंडी दिल्यानंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची नावे घोषित करण्यात आली. - जयंत डेहणकर,शहराध्यक्ष, भाजप