नांदगावपेठ : उद्योगक्षेत्रात नवी क्रांती घडवून नांदगावपेठ व बोरगाव धर्मा$ळे परिसराला नवी वाणिज्यिक ओळख देणाऱ्या ड्रीम्सलँड समूहाचे संचालक नरेंद्र भाराणी व संजय हरवाणी यांना नांदगावपेठ युवा महोत्सवच्यावतीने उद्योगभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी पुरस्कार दिला.जिल्हाधिकाऱ्यांनी महोत्सवाचे उद्घाटन केले. अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक होते. पत्रकार अनिल अग्रवाल, सरपंच दिगंबर आमले, स्वागताध्यक्ष नितीन हटवार प्रामुख्याने उपस्थित होते. उद्घाटन सत्रात नरेंद्र भाराणी व संजय हरवाणी यांना मान्यवरांच्या हस्ते शाल, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देण्यात आले. परिसरातील बेरोजगार युवकांच्या हाताला काम व समाजात सन्मानाने जगण्यासाठी पाठबळ दिल्याबद्दल युवा महोत्सव आयोजन समितीने त्यांना पुरस्कृत केले. आयोजनासाठी संजय बनारसे, सत्यजित राठोड, मंगेश तायडे, नीलेश मरोडकर, दिनकर सुंदरकर, मंगेश गाडगे, नीलेश कापडे, संतोष गहरवाल, भैया केचे, विनोद इंगळे, गणेश मुळे आदींनी परिश्रम घेतले.
संजय हरवाणी, नरेंद्र भाराणी यांना ‘उद्योगभूषण’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2018 01:09 IST
उद्योगक्षेत्रात नवी क्रांती घडवून नांदगावपेठ व बोरगाव धर्मा$ळे परिसराला नवी वाणिज्यिक ओळख देणाऱ्या ड्रीम्सलँड समूहाचे संचालक नरेंद्र भाराणी व संजय हरवाणी यांना नांदगावपेठ युवा महोत्सवच्यावतीने उद्योगभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
संजय हरवाणी, नरेंद्र भाराणी यांना ‘उद्योगभूषण’
ठळक मुद्देनांदगाव युवा महोत्सव : जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान