शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

संजय बंड अनंतात विलीन; साश्रू नयनांनी निरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2018 19:58 IST

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार संजय बंड हे शुक्रवारी अनंतात विलीन झाले. ‘बघा, बघा कोण आला शिवसेनेचा वाघ आला’ अशा जयघोषांनी सच्चा शिवसैनिकाला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला गेला.

अमरावती : शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार संजय बंड हे शुक्रवारी अनंतात विलीन झाले. ‘बघा, बघा कोण आला शिवसेनेचा वाघ आला’ अशा जयघोषांनी सच्चा शिवसैनिकाला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला गेला. सर्वपक्षीयांनी संवेदना व्यक्त करताना बंड यांचा सामाजिक, राजकीय प्रवास उलगडला. हसतमुख व्यक्तिमत्त्व हरपल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्यात. माजी आमदार संजय बंड यांचे गुरुवारी रात्री ९ वाजून २० मिनिटांनी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यानंतर श्रीविकास कॉलनी येथे त्यांच्या निवासस्थानी चाहते, आप्तस्वकीय, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकाºयांनी गर्दी केली होती. शुक्रवारी सकाळपासूनच अंत्यदर्शनासाठी एकच गर्दी झाली. दुपारी ३ वाजता फुलांनी सजवलेल्या वाहनावर त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. त्यानंतर अंत्ययात्रेला सुरुवात झाली. निवासस्थानाहून पुढे अंत्ययात्रा सायंस्कोर मैदान, राजकमल चौक, गांधी चौक होत हिंदू स्मशानभूमीत पोहचली. दरम्यान, अंत्ययात्रेवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी व त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यात आले. अंत्यविधीचे सोपस्कार आटोपताच मुलगा स्वराज याने जड अंतकरणाने पित्याच्या पार्थिवाला भडाग्नी दिला. यावेळी माजी आमदार बी.टी. देशमुख यांच्या अध्यक्षतेत शोकसभा घेण्यात आली. पालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार आनंदराव अडसूळ यांनी संवेदना व्यक्त केल्यात. दरम्यान, शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावतीने आमदार आशिष जयस्वाल यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्यात. संजय बंड यांनी सलग तीन वेळा वलगाव मतदारसंघाचे विधिमंडळात नेतृत्व केले. आमदार सुनील देशमुख, आ. यशोमती ठाकूर, आ. रवि राणा, आ. अरूण अडसड, आ. बच्चू कडू, आ. रमेश बुंदिले, आ. वीरेंद्र जगताप, आ. अनिल बोंडे, आ. श्रीकांत देशपांंडे, महापौर संजय नरवणे, माजी आमदार रावसाहेब शेखावत, माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे, शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख,  माजी खासदार अनंत गुढे, सुधीर सूर्यवंशी, नाना नागमोते, दिनेश बूब, सुनील खराटे, राजेश वानखडे, सोमेश्र्वर पुसदकर, दिनेश वानखडे, गजानन वाकोडे, भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी, अमरावती विद्यापीठाचे कुलसचिव अजय देशमुख, प्राचार्य आर.डी. सिकची, धनंजय पाटील यांच्यासह राज्यभरातून शिवसेनेचे जिल्हा व शहरप्रमुख आदींनी पार्थिवाचे दर्शन घेतले व अंत्ययात्रेत सहभागी झाले.

टॅग्स :Amravatiअमरावती