शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

संजनाचा संपविणारा सोहम रूग्णालयातून थेट पोलीस कोठडीत

By प्रदीप भाकरे | Updated: May 12, 2023 18:23 IST

Amravati News ब्रेकअपवर ठाम असलेल्या संजनाचा गळा कापून तिची निर्घूणपणे हत्या करणाऱ्या सोहम ढाले याचा रूग्णालयातील मुक्काम संपताच त्याची रवानगी बडनेरा पोलिसांच्या हवालातीत झाली आहे.

अमरावती : ब्रेकअपवर ठाम असलेल्या संजनाचा गळा कापून तिची निर्घूणपणे हत्या करणाऱ्या सोहम ढाले याचा रूग्णालयातील मुक्काम संपताच त्याची रवानगी बडनेरा पोलिसांच्या हवालातीत झाली आहे. सोहमला १२ मे रोजी दुपारी २ वाजता जिल्हा सामान्य रूग्णालयातून डिस्चार्ज मिळताच बडनेरा पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

दरम्यान, संजनाच्या कुटुंबियांचा संताप पाहता, सोहमला जिल्हा रूग्णालयात ज्या वार्डमध्ये ठेवण्यात आले होते, तेथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. शुक्रवारी दुपारी डॉक्टरांनी पुन्हा एकदा सोहमला तपासून तो ओके असल्याचे सर्टिफिकेट बडनेरा पोलिसांनी दिली. अन् त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. शुक्रवारी दुपारीच त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्याने याआधीच संजनाच्या खुनाची कबुली दिली असून, रक्तरंजित कटर देखील आधीच जप्त करण्यात आले आहे. 

म्हणून केली हत्याएक वर्षाच्या प्रेमप्रकरणानंतर ब्रेकअप करण्यावर ठाम राहत यापुढे त्रास दिल्यास कुटुंबीयांसह प्राध्यापकांकडे तक्रार करण्याची धमकी दिल्याने संजनाची हत्या केल्याची कबुली सोहम गणेश ढाले (१९) याने दिली. संजना शरद वानखडे (१९) व सोहम हे बडनेरा परिसरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात माहिती व तंत्रज्ञान शाखेत प्रथम वर्षाचे क्लासमेट होते. एक वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सोहमच्या त्रासाला कंटाळलेली संजना त्याच्यासोबत ब्रेकअप करणार होती. त्यावरच चर्चा करण्यासाठी ९ मे रोजी सायंकाळी दोघेही भेटले.

१० मे रोजी सकाळी संजना मृतावस्थेत तर सोहम जखमी अवस्थेत वडुरा शिवारातील नाल्यात आढळून आले होते. काही तासानंतर तपासात सोहमनेच संजनाचा खून करून स्वत:ला जखमी करून घेतल्याचे समोर आल्यावर त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संजनाची हत्या केल्याची कबुली दिल्याने पोलीस सोहमला अटक करण्यासाठी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याची वाट पाहत होते. शुक्रवारी दुपारी सोहमला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच पोलिसांनी त्याला अटक केली.

रुममेट, क्लासमेट्सचे बयाण नोंदविले

बडनेरा पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत संजना व सोहमचे रुममेट, क्लासमेट्स अशा सहा जणांचे बयान नोंदविले आहे. या प्रकरणात दोघांच्या आणखी काही कॉमन फ्रेण्ड्सचे बयान नोंदविण्यात येणार आहे, अशी माहिती बडनेराचे ठाणेदार नितीन मगर यांनी दिली. दरम्यान, गुरूवारी सायंकाळी संजनाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी