शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

‘व्याघ्र’मध्ये सॅनिटायझर ट्रॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 05:02 IST

चिखलदरा पर्यटनस्थळाला लागून संपूर्ण जंगल मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येते. या संपूर्ण परिसरात दररोज वाघ, अस्वल, बिबटे आदी वन्यप्राण्यांचे दर्शन ये-जा करणाऱ्यांना रस्त्यावरच होते. कोरोनापासून वाघांचे संरक्षण करण्यात व्याघ्र प्रकल्प व प्रशासन तत्पर असताना, कोरोनापासून या वन्यप्राण्यांच्या सुरक्षेची जबाबदारी वाढली आहे.

ठळक मुद्देखबरदारी । प्रकल्पात प्रवेशापूर्वी वाहनांचे निर्जंतुकीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : कोरोनासंदर्भात विशेष खबरदारी म्हणून मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अतिसंरक्षित जंगलातील वाघांसह अन्य वन्यप्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी जंगल सफारीला येणाऱ्या वाहनाचे नाक्यावरच सॅनिटायझेशन केले जात आहे. त्यासाठी सॅनिटायझर टँकची व्यवस्था येथे करण्यात आली.चिखलदरा व धारणी या दोन्ही शहरांत कोरोनाचा शिरकाव झाला. रुग्णांवर अमरावती, अचलपूर येथे उपचार होत आहेत. त्याची लागण मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत सिपना, गुगामल व मेळघाट वन्यजीव विभागाच्या अतिसंरक्षित क्षेत्रात मुक्त संचार करणाऱ्या वन्यप्राण्यांना होऊ नये, यासाठी आता पावले उचलण्यात आली आहेत. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक एम.एस. रेड्डी, उपवनसंरक्षक पीयूषा जगताप, शिवाबाला एस., विनोद शिवकुमार, चिखलदरा वनपरिक्षेत्र अधिकारी मयूर भैलुमे, ढाकणाचे हिरालाल चौधरी, सेमाडोहचे सम्राट मेश्राम, गाविलगडचे डी.एच. वाळके, घटांगच्या निशा मोकाशे, हरिसालच्या दीपाली चव्हाण आदींना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.वन्यप्राण्यांच्या संरक्षणाची जबाबदारीचिखलदरा पर्यटनस्थळाला लागून संपूर्ण जंगल मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येते. या संपूर्ण परिसरात दररोज वाघ, अस्वल, बिबटे आदी वन्यप्राण्यांचे दर्शन ये-जा करणाऱ्यांना रस्त्यावरच होते. कोरोनापासून वाघांचे संरक्षण करण्यात व्याघ्र प्रकल्प व प्रशासन तत्पर असताना, कोरोनापासून या वन्यप्राण्यांच्या सुरक्षेची जबाबदारी वाढली आहे. प्रशासनाने वारंवार सूचना देऊनसुद्धा स्थानिक रहिवासी उल्लंघन करीत असून, त्यांच्यावर कारवाई न झाल्यास पर्यटनस्थळासह वन्यप्राण्यांनाही कोरोनापासून धोका निर्माण झाला आहे.अशी आहे टँकची रचनामेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागांतर्गत वैराट जंगल सफारीसाठी जाण्यापूर्वी पर्यटकांसह व्याघ्र प्रकल्पाचे प्रत्येक वाहन सॅनिटाईज केले जाते. अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम.एस. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली यासाठी ६ बाय ४ मीटर व खोली २ फूट आहे. जवळपास एक हजार लिटरच्या टँकमध्ये नगरपालिकेने दिलेले सॅनिटायझर टाकले जाते.जंगल सफारीसाठी जाणारे प्रत्येक वाहन सुरक्षिततेच्या दृष्टीने सॅनिटाईज करण्यात येत आहे. वैराट जंगल सफारीपूर्वी वनपरिक्षेत्र महाविद्यालयाच्या नाक्यावर विशेष आकाराचा टँक बनविला आहे.- मयूर भैलुमेवनपरिक्षेत्र अधिकारी, चिखलदरा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याChikhaldaraचिखलदरा