शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय जागेवर वाळूसाठा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 22:33 IST

वाळूसाठा करणाऱ्यांच्या मुसक्या आवरण्याचे शासन आदेश असताना शहरात मोठ्या प्रमाणात वाळूचे साठे असूनदेखील त्याकडे महसूल विभागाने दुर्लक्ष चालविले आहे. एवढेच नव्हे, तर वाळूसाठा करणाºयांनी चक्क शासकीय जागेचा वापर केल्याचे वास्तव समोर आले आहे.

ठळक मुद्देप्रशासनाची चुप्पी : चढ्या दरात वाळूची विक्री; बांधकामधारक हैराण

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वाळूसाठा करणाऱ्यांच्या मुसक्या आवरण्याचे शासन आदेश असताना शहरात मोठ्या प्रमाणात वाळूचे साठे असूनदेखील त्याकडे महसूल विभागाने दुर्लक्ष चालविले आहे. एवढेच नव्हे, तर वाळूसाठा करणाºयांनी चक्क शासकीय जागेचा वापर केल्याचे वास्तव समोर आले आहे.वाळू तस्करांवर कठोर कारवाईसाठी राज्य शासन सरसावले आहे. वाळूमाफियांवर लगाम लावण्यासाठी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे. वाळूची चोरी रोखणे, हे महसूल विभागाच्या हाताबाहेरचे काम झाले आहे. त्यामुळे शासनाने वाळूमाफियांवर झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्याची (एमपीडीए) मुहूर्तमेढदेखील रोवली आहे.मात्र, शहरात ठिकठिकाणी वाळूसाठे कायम असताना याकडे स्थानिक महसूल विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे. साठा केलेली वाळू चढ्या दरात विकून बांधकामधारकांची लूट केली जात आहे. शहराच्या लोकवस्तीत साठवून ठेवलेली वाळू ही वर्धा, बेंबळा, नदी तर नजीकच्या नाल्यातून उपसा करून आणली जात आहे. गौण खनिज उपसा नियमानुसार वाळूसाठा करणे नियमबाह्य आहे. तरीदेखील शहरात मोठ्या प्रमाणात वाळूसाठा असल्याचे चित्र आहे. वाळूसाठ्याला महसूलच्या अधिकाºयांचे अभय आहे. परिणामी शासनाने वाळूमाफियांवर कारवाई करण्याचे ठरविले असले तरी प्रशासकीय अधिकाºयांचे वाळू तस्करासोबत असलेले लागेबांधे हे कठोर नियमांची अंमलबजावणी करताना छेद देणारे ठरतील, हे सत्य आहे. अमरावती, बडनेरा शहरात वर्धा व बेंबळा नदीतून वाळू विक्रीसाठी आणली जाते. बहुतांश रात्रीलाच वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती आहे. नदीघाटातून क्षमतेपेक्षा जास्त वाळूची वाहतूक करुन ती मोकळ्या जागेवर वाळू साठवणूक केली जाते. त्यानंतर व्यावसायीक ही वाळू ट्रकद्वारे बांधकाम स्थळी पोहचवितात. दोन ट्रक क्षमतेची वाळू आणून ती एकच ट्रक असल्याचे भासवून रॉयल्टी चोरी करण्याचा प्रकार अनेक वर्षांपासून कायम आहे. गौणखनिज चोरीतून वाळू तस्कर गब्बर झाले आहेत. परंतु, वाळूसाठा मध्यवस्तीत असूनही त्याकडे महसूल विभागाने दुर्लक्ष चालविल्याने यात गौडबंगाल असल्याचे नागरिकांत बोलले जात आहे.शहरात या भागात आहे वाळूसाठानियमांना छेद देत शहरात मोठ्या प्रमाणात वाळूसाठा आहे. यात स्थानिक दंत महाविद्यालयासमोरील प्रांगण, कारागृहाच्या मागील बाजू, राष्ट्रीय महामार्गालगतचे खुले मैदान, वडाळी येथील पाण्याच्या टाकीजवळ, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या बंगल्याजवळ, काँग्रेसनगरस्थित गजानन विद्यालय, वलगाव मार्गालगत अ‍ॅकेडमिक हायस्कूलचे प्रांगण, बडनेºयात जुन्या बायपासलगत, महेंद्र कॉलनी येथील खुले मैदान, फ्रेजरपुरा, वडरपुरा मार्ग, विलासनगर मार्गावरील हनुमान मंदिराचे मैदान आदी ठिकाणी वाळूसाठा आहे.अवैध वाळूसाठा करता येत नाही. त्याअनुषंगाने शासनाने कठोर पावले उचलली असून वाळू साठे करणाºयाविरुद्ध त्वरीत कारवाई केली जाईल.- अभिजित बांगरजिल्हाधिकारी, अमरावती.