शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
5
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
6
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
7
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
8
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
9
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
10
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
11
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
12
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
13
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
14
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
15
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
16
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
17
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
18
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
19
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला

अमरावती जिल्ह्यातील वाळूघाट बंद; स्वस्त वाळूही मिळेना

By जितेंद्र दखने | Updated: May 20, 2023 19:30 IST

स्वत वाळू मिळण्याची वाट बघत झोपडं टाकून राहायचं का साहेब? अंमलबजावणीत अडथळे 

जितेंद्र दखने, अमरावती: अवैध वाळूच्या तस्करीला लगाम लावण्यासाठी; तसेच वाळू माफियांपासून सर्वसामान्यांची सुटका व्हावी, याकरिता राज्य शासनाने नवीन वाळू धोरणाची घोषणा केली. महिनाभरापूर्वी शासनाने या धोरणाला मान्यता दिली. आता दीड ते दोन महिने होऊनही प्रत्यक्षात स्थानिक स्तरावर नवीन वाळू धोरणाच्या अंमलबजावणीत अडथळे येत आहेत.

सध्या बांधकामांचा हंगाम सुरू असून, दरदिवशी शहर व जिल्ह्यात सुमारे १२०० ब्रास वाळू येत आहे. जिल्ह्यातील वाळूघाट सुरू असल्यानंतर वाळू सुमारे ४००० रुपये ब्रासने सर्वसामान्यांना मिळू शकली असती; मात्र जिल्ह्यातील वाळूघाट अजूनही बंद असल्यामुळे शेजारच्या मध्य प्रदेशातून येत असलेल्या वाळूसाठी ७००० रुपये ब्रासप्रमाणे पैसे मोजावे लागत आहेत. यामुळे दरदिवशी वाळू खरेदी करणारे बांधकाम व्यावसायिक, नागरिकांना सुमारे ३६ लाख रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे शासकीय वाळूघाट अद्यापही सुरू झाले नसल्याने सर्वसामान्यांना नवीन वाळू धोरणानुसार प्रतिब्रास ६०० रुपयांना मिळणारी वाळू दिवास्वप्न ठरत आहे. अशात गत वर्षभरापासून वाळूघाट बंद असल्याने कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला आहे.निविदा प्रक्रियेला मिळेना प्रतिसाद

राज्य शासनाच्या नवीन वाळू धोरणाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हा खनिकर्म विभागाने जिल्हाभरातील ४४ वाळूघाटांमधून वाळू उपसा करणे व डेपोपर्यंत वाळूची वाहतूक करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली. विशेष म्हणजे सलग तीनवेळा निविदा मागविल्यानंतर ४४ पैकी केवळ ११ ठिकाणीच निविदा आल्यात. मात्र, यात तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने ही प्रक्रियासुद्धा तूर्तास थांबली आहे.१० जूननंतर उपसा बंद

राज्य शासनाच्या धोरणानुसार दरवर्षी वाळूघाटातील उपसा १० जून ते ३० सप्टेंबरपर्यंत बंद राहतो. त्यामुळे शासनाच्या नवीन वाळू धोरणानुसार सर्वसामान्यांना ६०० रुपये प्रतिब्रास मिळणारी वाळू आता किमान ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापर्यंत तरी मिळू शकणार नाही. परिणामी सहा ते सात हजार रुपयांनी वाळू खरेदी करावी लागणार आहे.जिल्ह्यात ४४ वाळूघाट

जिल्ह्यातील ८ तालुक्यांत ४४ शासकीय वाळूघाट आहेत. यामध्ये जावरा फत्तेपूर, इसापूर, नमस्कारी, चांदूर ढोरे, भारवाडी (तिवसा), गणोजा देवी, दाढी, चाकूर, कानफोडी, नांदेड खु., भातकुली, नायगाव, दिघी, महल्ले, गोकुळसरा भाग १ व २ बोरगा निस्ताने (धामणगाव रेल्वे) निंभार्णी, शिवरा भाग १ ते ३ (मोर्शी) नांदेड बु., खानपूर चिपर्डा, जहानपूर दिली, वडुरा, करतखेड, लासूर, रामतीर्थ, चांडोळा (दर्यापूर), हिवरापूर्णा, येलकी पूर्णा, सावळापूर, खानापूर, दोनोडा, खैरी, येसुर्णा, निंभारी, वडगाव खु., सावळी बु. (अचलपूर), तळणी पूर्णा, खाकरखेडा पूर्णा (चांदूर बाजार), सोनाबर्डी, रत्नापूर, मोखा, चिचघाट (चिखलदरा).

४४ पैकी ३३ घाटांकरिता तीनदा निविदा मागविल्या; मात्र याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता याबाबत काय निर्णय घ्यायचा, यासंदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यावर पुढील निर्णय घेऊ. - इम्रान शेख, जिल्हा खनिकर्म अधिकारी.

टॅग्स :Amravatiअमरावतीsandवाळू