शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

अमरावती जिल्ह्यात १४ ठिकाणी सुरू होणार वाळू डेपो

By जितेंद्र दखने | Updated: May 2, 2023 18:39 IST

Amravati News नव्या वाळू धोरणानुसार जिल्ह्यात १४ ठिकाणी वाळू डेपो सुरू केले जाणार असून त्यासाठी जिल्हा खनिकर्म विभागाद्वारे निविदा देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

जितेंद्र दखनेअमरावती : नव्या वाळू धोरणानुसार जिल्ह्यात १४ ठिकाणी वाळू डेपो सुरू केले जाणार असून त्यासाठी जिल्हा खनिकर्म विभागाद्वारे निविदा देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात ४४ वाळू घाटातून वाळू उपसा करून या १४ डेपोंमध्ये जमा केली जाणार आहे. तेथून नागरिकांना ६०० रुपये ब्रास प्रमाणे विक्री केली जाणार आहे.

वाळूच्या अवैध वाहतुकीसह तस्करीला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून अनेक प्रयत्न करण्यात आले. परंतु यामध्ये तस्करी रोखणे शक्य झाले नाही. त्यामुळे ६०० रुपये ब्रास वाळू असतानाही नागरिकांना प्रतिब्रास हजारो रुपये मोजावे लागत. अवैध वाळूच्या व्यवसायाला रोखण्यासाठी आणि नागरिकांना स्वस्तात वाळू मिळावी यासाठी यावर्षी शासनाने नवे वाळूचे धोरण आणले आहे. त्यानुसार आता वाळू घाटांचे लिलाव रद्द करून वाळू डेपो तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर्षी जिल्ह्यातील ४४ वाळू घाटांना राज्यस्तरीय समितीने मंजुरी दिली होती. नव्या वाळू धोरणानुसार जिल्ह्यात विविध ठिकाणी १४ वाळू घाट तयार करण्यात येणार आहे.

यामध्ये तिवसा,भातकुली,धामनगाव रेल्वे,मोर्शी, दर्यापूर,अचलपूर,चांदूर बाजार आणि धारणी तालुक्यातील या डेपोंचा समावेश आहे. विविध ठिकाणच्या ४४ वाळू घाटातून वाळू उपसा करून या डेपोमध्ये जमा केली जाणार आहे. या वाळू डेपोत १३४,५०६ ब्रास वाळू जमा केली जाणार आहे. ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर या डेपोतून ६०० रुपये ब्रासने खरेदी करता येणार आहे. डेपोतून ६०० रुपये ब्रासने जरी वाळू खरेदी करता येत असली तरी डेपोतून वाळू नेण्याचा खर्च नागरिकांना स्वतः करावा लागणार आहे.

मात्र त्यासाठी वाहतुकीचे दर जिल्हा प्रशासन निश्चित करणार आहे. डेपो तयार करणे, वाळू घाटातून वाळू उपसा करणे, वाळूची वाहतूक करून ती डेपोत जमा करणे आणि नागरिकांनी निश्चित तयार विक्री करणे यासाठी प्रशासनाने निविदा प्रसिद्ध केली आहे.सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन डेपो तयार केले जाणार आहेत. त्यानंतर नागरिकांना निश्चित दरात वाळू उपलब्ध करून दिली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा खनिकर्म विभागाचे सूत्रांनी दिली.येथे होणार वाळू डेपोतिवसा तालुक्यातील फत्तेपूर जावरा,चांदूर ढोरे, धामंत्री,भातकुलीमधील गणोरी, नावेड, धामणगाव रेल्वेतील जळगाव मंगरूळ, मोर्शीत तळणी, दर्यापूर मधील खानापूर चिपर्डा,बनोसा,अचलपूर हिवरा, निंभारी,चांदूर बाजार टोंगलापूर, तळणी पूर्णा, धारणी मधील तलई आदी ठिकाणांचा समावेश आहे.

टॅग्स :sandवाळू