चार महिन्यांत ४० लाखांचा महसूल : वाळू साठ्याचा लिलावअमरावती : तालुका तथा शहराच्या विविध भागांत होणारी वाळुची चोरटी वाहतूक आणि अवैध विक्रीवर अंकुश घालण्यात तहसील प्रशासन बऱ्यापैकी यशस्वी ठरली आहे. आॅगस्टपासूनच्या चार महिन्यांत वाळू संबंधीच्या कारवाईतून तहसील प्रशासनाने सुमारे ४० लाख रुपयांचा महसूल गोळा केला. यात ६१ जणांंकडून वसूल केलेल्या १६ लाख रुपये दंडाच्या रकमेचासुध्दा समावेश आहे.अमरावती तहसील प्रशासनाने आॅगस्ट ते नोव्हेंबर या चार महिन्यांत २९ वाळू साठ्यांचा लिलाव केला. तब्बल ६६ पेक्षा अधिक ठिकाणी धाडी टाकून अमरावतीचे तहसीलदार सुरेश बगळे आणि त्यांच्या पथकाने शहरातील विविध ठिकाणी धाडसत्र राबवून वाळू चोरट्यांवर अंकुश लावला आहे. वडाळी परिसरात एका वाळू चोरट्याने तहसीलदाराच्या अंगावर ट्रॅक्टर आणण्याचा प्रयत्न केल्यानंतर शहरात वाळूची अवैध विक्री व साठा करून ठेवणाऱ्यांवर कारवाईला सुरूवात झाली होती. ४ महिन्यांत ६६ ठिकाणी धाडी घातल्यानंतर त्यापैकी ६१ प्रकरणांत १६ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय ५ जण न्यायालयात गेले आहेत. यातील एक प्रकरण उपविभागीय कार्यालय, १ प्रकरण दिवाळी न्यायालयाच्या तर उपर्वरित ३ मुुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात न्यायप्रविष्ठ आहेत. नोव्हेंबर २०१५ मध्ये अमरावती तहसील प्रशासनाने १६ प्रकरणांत कारवाई केली आहे. यात अवैध वाहतुकीवर ओव्हरलोड ट्रक, बिनारॉयल्टी वाहतूक या प्रकरणांचा समावेश आहे. यातून प्रशासनाला ३.५० लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. तहसीलदारांच्या पथकाने अगदी झाडाझुडपांमध्ये दडवून ठेवलेला वाळूसाठा जप्त करून त्याचा लिलाव केला आहे. अवैधरीत्या वाळूसाठा असलेल्या ४.२ वाळू साठ्यांवर जप्तीची कारवाई करण्यात आली. याशिवाय अमरावती तालुक्यातील टाकळी जहागीर, पर्वतापूर, रोहनखेड या वाळू घाटांचा लिलावातूनही सात लाख रुपयांचा महसूल गोळा झाला. (प्रतिनिधी)
वाळू चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या
By admin | Updated: December 12, 2015 00:10 IST