शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
4
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
5
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
6
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
7
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
8
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
9
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
10
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
12
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
13
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
14
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
15
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
16
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
17
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
18
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
19
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
20
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?

वरूडच्या महेंद्री जंगलाला अभयारण्याची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 05:01 IST

सातपुड्याच्या कुशीत वरूड वनपरिक्षेत्राचे १० हजार २०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र आहे. या जंगलालगत सातपुड्याच्या डोंगररांगा आहेत. वर्धा डायव्हर्शन सुपर एक्सप्रेस कॅनाल तसेच शक्ती, जीवना, चुडामणी, सोकी नद्या याच पर्वतातून तालुक्यात प्रवाहित होतात. भेमडी, झटामझिरी, शेकदरी, नागठाणा-१ आणि २, सातनूर, पुसली, वाई, पंढरी मध्यम प्रकल्प, पंढरी प्रकल्प असून, वाघ, बिबट, अस्वल, रोही, हरिण, रानडुकरांसारखे प्राणी या जंगलात आहेत.

ठळक मुद्देव्हिडीओ कॉन्फरन्सिंग : मुख्यमंत्र्यांचे वनविभागाला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या महेंद्री जंगलाला अभयारण्याचा दर्जा देण्याच्या प्रस्तावाला राज्य शासनाने तत्वत: मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाच्या नागपूर येथे बैठकीत या अभयारण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश वनविभागाला दिले. यामुळे वरूड तालुक्याच्या वनवैभवात भर पडली असून, जंगल टुरिझमला चालना मिळणार आहे.सातपुड्याच्या कुशीत वरूड वनपरिक्षेत्राचे १० हजार २०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र आहे. या जंगलालगत सातपुड्याच्या डोंगररांगा आहेत. वर्धा डायव्हर्शन सुपर एक्सप्रेस कॅनाल तसेच शक्ती, जीवना, चुडामणी, सोकी नद्या याच पर्वतातून तालुक्यात प्रवाहित होतात. भेमडी, झटामझिरी, शेकदरी, नागठाणा-१ आणि २, सातनूर, पुसली, वाई, पंढरी मध्यम प्रकल्प, पंढरी प्रकल्प असून, वाघ, बिबट, अस्वल, रोही, हरिण, रानडुकरांसारखे प्राणी या जंगलात आहेत. अनेक पक्षी, फुलपाखरांच्या प्रजाती आहेत. वनौषधी परिसर, गव्हाणकुंड आणि धनोडी येथे वनउद्यान आहे. अनेक प्रकारची वृक्षे आहेत. १०८ वर्षांचे ऐतिहासिक विश्रामगृहसुद्धा आहे. यामुळे अनेक वर्षांपासून महेंद्री-पंढरी परिसर अभयारण्य घोषित करावे, अशी मागणी वन्यप्राणीप्रेमींकडून केली जात होती. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र वन्यजीव मंडळासोबत व्हिसीद्वारे बैठक घेऊन महेंद्री जंगलाला अभयारण्य करण्यास मंजुरात दिली. तसा प्रस्ताव वनविभागाने तातडीने सादर करावा असे आदेश दिले. यावेळी पक्षिप्रेमी किशोर रिठे, वन्यजीव अभ्यासक यादव तरटे उपस्थित होते.अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी शासनाने पूर्ण केली. वरूड तालुक्यातील जंगलात पशू-पक्ष्यांच्या अनेक प्रजाती आहेत. विस्तीर्ण असे जंगल आहे. अभयारण्यामुळे देश-विदेशातील अभ्यासक येथे येऊन संशोधन करतील. वरूड तालुक्याचे महत्त्व वाढेल.प्रशांत लांबाडे, वनाधिकारीपर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला. महेंद्री अभयारण्याला मान्यता देण्यासाठी पुढाकार घेतला. मुख्यमंत्र्यांनी वनविभातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना तसा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले.देवेंद्र भुयार, आमदार, मोर्शीमहेंद्री वनक्षेत्रात अभयारण्याला मंजुरी मिळाल्याने पक्षिमित्रांना अभ्यासाची संधी मिळेल. या परिसरात विदेशी पक्ष्यांचा आॅगस्ट ते डिसेंबर दरम्यान वावर असतो. परिसराचे नाव जगाच्या नकाशावर येईल.आशिष चौधरी, पक्षीमित्र, वरूड 

टॅग्स :forestजंगल