शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

बैलजोडींची खरेदी-विक्री बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 5:00 AM

अंजनगाव सुर्जी बाजार समितीत भरणाऱ्या बैलबाजारात अकोला, खान्देश, मध्य प्रदेश व आजूबाजूच्या तालुक्यांमधून बैलजोड्या खरेदी-विक्रीसाठी आणल्या जातात. त्या व्यवहारात लाखोंची उलाढाल होत असते. बैलजोडीचा बाजारभाव ६० ते ९० हजारांपर्यंत असतात. लॉकडाऊन कालावधीत हे व्यवहार ठप्प झाले आहेत.

ठळक मुद्देशेतीच्या उदिमात बैलांचे महत्त्व; शेतकऱ्यांना चिंता खरिपाची

लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अंजनगाव सुर्जी येथील गुरांच्या बाजारात बाजारात बैलजोडी खरेदी-विक्री बंद आहे. त्यामुळे दीड महिन्यांत लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे. दुसरीकडे बैलांकरवी होणाºया शेतीच्या मशागतीअभावी शेतकरी चिंतेत सापडला आहे.अंजनगाव सुर्जी बाजार समितीत भरणाऱ्या बैलबाजारात अकोला, खान्देश, मध्य प्रदेश व आजूबाजूच्या तालुक्यांमधून बैलजोड्या खरेदी-विक्रीसाठी आणल्या जातात. त्या व्यवहारात लाखोंची उलाढाल होत असते. बैलजोडीचा बाजारभाव ६० ते ९० हजारांपर्यंत असतात. लॉकडाऊन कालावधीत हे व्यवहार ठप्प झाले आहेत.ट्रॅक्टरमुळे शेतीची कामे गतिमान झाली, यात शंका नाही. मात्र, अजूनही शेतीच्या बºयाच कामांना बैलजोडीशिवाय पर्याय नाही, हे वास्तव आहे. खरीप हंगामात शेतीची तयारी करीत असताना सरी पाडणे, वखरवाहीसाठी बैलजोडीला प्राधान्य दिले जाते. त्याच बरोबर गावांत शेतरस्ते नाहीत. तेथे शेतमाल वाहतुकीसाठी तसेच सर्वसामान्य शेतकऱ्यांना बैलजोडी महत्त्वाची असते. बैलजोडी खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प असल्याने वखरणी बंद झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे.अमरावती शहराव्यतिरिक्त ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा अधिक शिरकाव झाला नसल्याने शेतकरी खरीपाच्या पूर्वमशागतीला लागले आहेत. त्यामुळे ट्रॅक्टरची मागणी अचानक वाढली आहे. त्यात वखरणी, नांगरणीचे भावही वाढले आहेत. त्यामुळे बैलजोडीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. मात्र बाजार लॉकडाऊन झाल्यामुळे बैलांचे खरदी-विक्री व्यवहार थांबलेले आहेत. दरम्यान पुण्या-मुंबईहून अनेकजण परतले असून ते पारंपारिक शेतीकडे वळले आहेत.घरातील कर्ता पुरूष शेती कसत असताना दुसरा आल्याने शेतीची मागणी वाढली आहे. त्यामुळे अनेकांचा मक्त्याने शेती करण्याकडे कल असून त्यांच्याकडूनही बैलजोडीबाबत विचारणा केली जात आहे. लॉकडाऊनमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.दलाल चिंतेतबैलजोड्यांच्या खरेदी-विक्री व्यवहारात महत्त्वाची भूमिका बजावणाºया दलालांना बाजार बंद असल्याने हातावर हात धरून बसण्याऐवजी दुसरा पर्याय राहिलेला नाही. त्यांचा रोजगार बुडाला आहे. करोनाचे संकट दूर होऊन बाजार सुरू व्हावा, अशी मनोमन प्रार्थना ते करीत आहेत.लॉकडाऊनच्या काळात गुरांच्या बाजारात फिजिकल डिस्टन्सिंग पाळले जाणार नाही. गर्दी होईल. त्यामुळे शासनादेशाने बाजार बंद आहे. दुसरीकडे शेतकºयांना बैलजोडी आवश्यक आहे, हे आम्ही जाणतो. त्याविषयी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.- गजानन नवघरे,सचिव, बाजार समिती,अंजनगाव सुर्जी

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती