शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
2
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
3
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
4
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
5
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
6
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
7
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
8
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
9
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
10
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
11
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
12
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
13
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
14
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
15
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
16
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
17
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
18
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
19
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
20
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार

उघड्यावरील मांस विक्रीे श्वानांना करताहेत आकर्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2019 01:37 IST

शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेली उघड्यावरील मांस विक्री श्वानांना आकर्षित करीत आहे. मांस खाण्यासाठी श्वान झुंबड करीत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मांस खाणाऱ्या श्वानांमध्ये शिकारी वृत्ती वाढत असल्याचे प्राणीप्रेमींनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देरोगराईला बळ : नियंत्रणाकरिता प्रशासनाने ठोस पाऊल उचलण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील विविध ठिकाणी सुरू असलेली उघड्यावरील मांस विक्री श्वानांना आकर्षित करीत आहे. मांस खाण्यासाठी श्वान झुंबड करीत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मांस खाणाऱ्या श्वानांमध्ये शिकारी वृत्ती वाढत असल्याचे प्राणीप्रेमींनी स्पष्ट केले. मांसातील विषाणुंमुळे श्वान आजारी पडत असल्याचेही निदर्शनास येत आहे.उघड्यावर मांस कापणे हे कायद्याने गुन्हा ठरते, मात्र अमरावती शहरात सर्रास उघड्यावर मांस कापून विक्री केली जात आहे. मांस खाणे खवय्यांचीही गर्दी या प्रतिष्ठानावर वाढत आहे. मात्र ते मांस खाण्यायोग्य आहे किंवा नाही, याची तपासणी कोणतीही यंत्रणा करीत नाही. त्यामुळे मांस खाण्यामुळे रोगराई पसरण्याचीही भीती निर्माण झाली आहे. त्यातच उघड्यावर मांस विक्री करणारे व्यवसायिक मांसाचा निरुपयोगी भाग एखाद्या कचरा कुंडीत टाकतात किंवा नाल्यात फेकतात. बडनेरानजीक जुन्या वस्तीत, शुक्रवार बाजारानजीक आशियाना क्लबजवळ, खोलापुरी गेटसमोर, लोणटेक मार्ग, न्यू कृष्णार्पण कॉलनी चौकातील मार्ग आदी ठिकाणी उघड्यावर मांसविक्रीची दुकाने थाटून आतड्यासह वेस्टेड फेकले जात असल्याचे आढळून येत आहे. याच भागात श्वानांची गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे उघड्यावरील मांस विक्रीबद्दल प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे.श्वान अपघाताच्या घटनांत वाढवेस्टेज मांस फेकताच त्यावर ताव मारण्याकरिता श्वान तुटून पडतात. अशात रस्ता अपघातात श्वानांचा बळी जात आहे. जखमी अवस्थेत उपचाराअभावी बहुतांश श्वान दगावण्याच्या घटना घडतात. पंचवटी ते गॅलक्सी बारदरम्यान वाहनाच्या धडकेत श्वान गंभीर जखमी झाला. वसा संस्थेचे प्राणीप्रेमी गणेश अकर्ते निखिल फुटाणे यांनी त्याला वैद्यकीय मदत पुरविली.श्वान पडत आहेत आजारीमांसातील विषाणूमुळे श्वानांना पोटाचे विकार होतात. पातळ हगवण लागणे हे या रोगाचे मुख्य कारण आहे. मांस विक्रेते कोंबड्यांचे आतडे रस्त्याच्या कडेला फेकतात. ते खाण्यासाठी श्वानांची झुंबड उडते. कच्चे मांस खाल्ल्यामुळे श्वानांमधील शिकारी वृत्ती वाढत असून, त्यांच्यात रोगराई पसरण्याची भीती असल्याचे प्राणीप्रेमींचे मत आहे.

टॅग्स :Healthआरोग्य