शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत ब्रॅन्डेडच्या नावावर डुप्लिकेट घड्याळांची विक्री; ६.७१ लाखांचा माल जप्त

By प्रदीप भाकरे | Updated: April 18, 2023 18:13 IST

Amravati News ब्रॅन्डेडच्या नावावर डुप्लिकेट घडयाळ विक्रीचा गोरखधंदा खोलापूरी गेट पोलिसांनी हाणून पाडला.

प्रदीप भाकरे अमरावती: ब्रॅन्डेडच्या नावावर डुप्लिकेट घडयाळ विक्रीचा गोरखधंदा खोलापूरी गेट पोलिसांनी हाणून पाडला. स्थानिक जवाहरगेट भागातील शनिमंदिराजवळ असलेल्या डायमंड वॉच या प्रतिष्ठानातून पोलिसांनी सुमारे ६ लाख ७१ हजार रुपयांचा माल जप्त केला. याप्रकरणी १७ एप्रिल रोजी रात्री ९.१४ च्या सुमारास आरोपी घड्याळविक्रेता एजाजखान हिदायतखान (३४, रा. गुलिस्तानगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला.

                  एजाजखान याच्या दुकानातून ६ लाख ४० हजार रुपये किमतीची फास्टट्रॅकच्या डुप्लिकेट घड्याळे, २७ हजार रुपये किमतीचे २७० डायल व ४९०० रुपये किंमतीचे चष्मे असा एकुण ६.७१ लाख रुपयांचा माल जप्त करण्यात आला. आरोपीने तो माल विक्रीसाठी बाळगला असल्याचे निष्पन्न झाले. आरोपी ती घड्याळे व चष्मे फास्टट्रॅकचे आहेत, अशी बतावणी करून त्याआड डुप्लिकेट माल विकत असल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यांनी १७ एप्रिल रोजी दुपारी एकच्या सुमारास खोलापूरी गेट पोलिसांच्या मदतीने डायमंड वॉच येथे ट्रॅप केला. त्यावेळी तो स्वत:च्या आर्थिक फायद्याकरीता ब्रॅन्डेड कंपनीच्या घडयाळांऐवजी हुबेहुब तशाच दिसणारी घड्याळे विक्रीकरिता बाळगत असताना मिळून आला. याप्रकरणी क्ंपनी प्रतिनिधी गौरव तिवारी (३६, नवी दिल्ली) यांच्या तक्रारीवरून खोलापुरी गेट पोलिसांनी कॉपीराईट कायदयान्वये गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी