सतीश बहुरुपी राजुराबाजारयेथे सर्व खेड्यांना जोडणारी आणि विदर्भातील एकमेव बैलबाजार आणि धान्य बाजाराला सुरुवात झाली होती. अख्ख्या विदर्भातून येथे गोधन विक्रीला येते. खरीददारांची संख्या सुध्दा मोठी असते. १० हजार रुपयापासून तर एक लाख रुपयापर्यंत गोधन विकल्या जाते. यामध्ये बैलजोडी एकापेक्षा एक सरस येत असून २५ हजारापासून तर एक लाख रुपयांपर्यंत किंमती असतात. यावषी दुष्काळाचे सावट आणि तणनाशकाच्या वापरामुळे चारा टंचाई भासू लागली आहे. शेतकऱ्यांना शेतीव्यवसायात मोठे नुकसान झाल्याने गोधनसुध्दा विक्रीला काढावे लागत आहे. राजऱ्याच्या ब बाजारात विदर्भासह खानदेशातूनसुध्दा गुरें विक्रीला आणतात. कोंबड्या, बकऱ्या, गाई, बैल, म्हशी मोठ्या प्रमाणात या बाजारात विक्रीला आणतात. हा परिसर सधन असल्याने उत्तमप्रतीच्या गुरांना अधिक किमत मिळते. कृषी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या वरुड तालुक्यात गोधन पालकांची संख्या अधिक आहे. परंतु काळ बदलल्याने यांत्रिक शेतीला अधिक महत्त्व आले आहे. महागाईमुळे मजुरीचे दर वाढले तसेच मजुरांचा तुटवडा भासत असल्याने शेतकऱ्यांना शेती करणे अवघड होत आहे. यामुळे तण काढण्याकरिता सरळ तणनाशकाचा वापर करून फवारणी केल्याने शेतातील हिरवळ हद्दपार झाली. यामुळे हिरवा चारासुध्दा दुरापास्त झाला आहे. डिसेंबरमध्ये अतिवृष्टी तर जानेवारी, फेब्रुवारीपासूनच पाण्याची टंचाई भासू लागली. यामुळे मक्का, किंवा हिरवा चारा पेरला गेला नाही जनावराकरीता लावलेला , ज्वारीचा कडबा, भूईमुगाचे कुटार, मका, सोयाबिनचे कुटारसुध्दा मिळणे दुरापात्र झाले आहे. जनावरांना चारा मिळेनासा झाला. गोधनाला चारा कोठून आणावा, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. यामुळे शेकडो गोधन राजुरा बाजारच्या बैलबाजारात विक्रीला येत आहेत. यामुळे गोधनाच्या चाऱ्याकरिता शासनाने चारा डेपो उघडला तरच गोधन वाचू शकतील.
राजुऱ्याच्या बाजारात गोधनाची बेभाव विक्री
By admin | Updated: April 27, 2016 00:07 IST