शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

संत बेंडोजी महाराज पालखी पिंपळदकडे मार्गस्थ

By admin | Updated: July 7, 2016 00:04 IST

आषाढी एकादशीच्या महा पवित्र मुहूर्तावर काळ्या सावळ्या विठाईचे दर्शन घेण्याची ओढ आता संपणार असून संत बेंडोजी महाराज पालखीने पिंपळोद मार्गस्थ केले आहे़

हजारो वर्षांची परंपरा : विदर्भातील एकमेव पालखी धामणगाव रेल्वे/चांदूररेल्वे : पंढरीसी जारे आल्याने, संसारा दिनाचा सोयरा पांडुरंगमाजे क निची आवडी, पंढरपुरा नेईन गुढीनाम घेता वाट चाली, यश पाऊला पाऊलीआषाढी एकादशीच्या महा पवित्र मुहूर्तावर काळ्या सावळ्या विठाईचे दर्शन घेण्याची ओढ आता संपणार असून संत बेंडोजी महाराज पालखीने पिंपळोद मार्गस्थ केले आहे़राज्यातील हजारो भाविकांचे श्रध्दास्थान तसेच विदर्भातील एकमेव संजीवनी समाधी स्थान असलेल्या घुईखेड येथील संत बेंडोजी महाराज पालखीला दीडशे वर्षांची परंपरा आहे़ गत २ जून रोजी निघालेली ही संत बेंडोजी महाराज पालखी टाळ मृदंगाच्या गजारात व विठ्ठल नामाच्या जयघोषात आषाढीवारीने पंढरपूरकडे आगेकुछकरीत बुधवारी लोणदमध्ये पोहचली आहे़ येथून पिंपळदोकडे मार्गस्थ होणार आहे़ या पालखी सोबत हजारो भाविक जुळले आहेत़ संत ज्ञानेश्वर माऊली नंतर स्वतं: शिष्य व भक्तांना साक्ष ठेवून १६ व्या वर्षी समाधी घेतलेले संत बेेंडोजी महाराज व सन १९३१ पासून वऱ्हाड प्रांतातील एकमेव असलेल्या पालखी चा मान माऊलीच्या पालखीसह विठ्ठल मंदिरात पुढून प्रवेश करणाऱ्या २१ मानकऱ्यांमध्ये १७ वा क्रमांक आहे़ ही परंपरा कायम आहे़ आजपर्यंत संत बेेंडोजी महाराज या संस्थानला संत ज्ञानेश्वर माऊलीच्या काळातच सन १३३७ मध्ये असणारे प्राचीन मंदीर म्हणून पहिला बिल्ला, तर दुसऱ्यांदा सन १८१९ असे दोन बिल्ले, असा मान प्राप्त झाला आहे़ सर्वात प्रथम खुशाल महाराज यांनी त्या काळात पंढरपूरला पालखी नेण्यासाठी सुरूवात केली होती. शंकरराव बढे, विठोबा काकडे, पुंढलीक येवले, गोडेमहाराज ही संत बेंडोजी महाराजांची पालखी घेवून जात आहे़ संस्थानचे अध्यक्ष दिनकरराव रामचंद्र घुईखेडकर यांच्या नेतृत्वात या पालखीचा दरवर्षी घुईखेड ते पैठण व तेथून आळंदी, ते पंढरपूर असा ४८ दिवसाचा प्रवास या वारीतून होतो. प्रश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, याभागातील अनेक तालुक्यातील वारकरी बेंडोजी महाराजांच्या पादुका आपल्या डोक्यावर घेण्याकरीता एकच गर्दी करीत आहे़ (तालुका प्रतिनिधी)झुनका भाकरीची न्याहारीविठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या संत बेंडोजी महाराज पालखीतील वारकऱ्यांनी अमरावती, वाशीम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद असे जिल्हे पार करून पैठण येथील संत एकनाथांच्या पायथ्याशी नथमस्तक होत पुढे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोबत पिंपळदोकडे मार्गस्त झाली आहे़माऊलीच्या पालखीसह विठ्ठल मंदिरात पुढून प्रवेश करणाऱ्या २१ मानकऱ्यामध्ये १७ वा क्रमांक विदर्भाला मिळालेला हा बहुमान आहे़ पालखीत शेकडो वारकरी सहभागी झालेले आहेत.- प्रवीण घुईखेडकर,विश्वस्त, संत बेंडोजी महाराज देवस्थांन, घुईखेड