अमरावती : दर्यापूरची जंगी सभा़ शरद जोशी त्या सभेला संबोधित करीत होते़ ती सभा म्हणजे शेतकऱ्यांच्या वेदनांचा हुंकारच़ भाषणाला सुरूवात केली नि ते म्हणाले, 'आपण येथे मृतांच्या सोहळ्याला जमलेलो आहोत'़ त्यांच्या या वाक्याने माझ्या मनाचा ठाव घेतला़ मी त्याच क्षणी माझे सर्वस्व त्यांना अर्पण केले...विदर्भात शरद जोशींनी जी एन्ट्री केली ती दर्यापुरातूऩ त्यांनी दर्यापुरातील बाजार समितीच्या मैदानावर घेतलली सभा म्हणजे अंगार होता. शेतकऱ्यांचा जणू कुणी मसिहाच अवतरला होता़ शेतकरी जे नागावले गेले आहेत, ज्यांनी अनंत वेदना सहन केल्या आहेत, काहींना असह्य वेदनांमुळे हे जग सोडावे लागले, अशा सर्व शेतकऱ्यांचा हा मृत्यू सोहळाच होय, असे वर्णन शरद जोशी यांनी या सभेत केले होते़ 'शेतकऱ्यांचा मृत्यूसोहळा' साजरा करणारा तो पहिला नि एकमेव नेता होता़ जातीचाच प्रश्न असेल तऱ़़दर्यापूर विधानसभेची २००६ साली पोटनिवडणूक होती़ शरद जोशी यांनी मला उमेदवारी देण्याची सूचना केली़ निवडणूक खुल्या प्रवर्गासाठी होती़ मी त्या जातीनुकूल नव्हतो़ त्यामुळे ही निवडणूक मी लढू नये, अशी माझी मनापासूनची इच्छा होती़ मी वारंवार नकार देत राहिलो; पण माझा नकार साहेब ऐकेनात़ अखेरीस माझ्या काही सहकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली़ त्यांनी साहेबांना मी निवडणूक न लढण्यासाठीचे कारण सांगितले़ त्यावर त्यांचे उत्तर होते- विजय विल्हेकर याच्या खांद्यावर जर संघटनेच्या आंदोलनाची धुरा सोपविली जाऊ शकते तर निवडणुकीची का नाही? १२ मते मिळालीत तरी चालेल, पण माझा उमेदवार विजयच असेऩ त्यांनी निर्णय दिला़ देशातील एनडीएशी झालेली युती तोडून त्यांनी मला उमेदवारी दिली़ इतर सर्व पक्षांनी बाहेरून उमेदवार आणले होते़ खुल्या प्रवर्गानुकूल उमेदवार देण्यात आले होते़ शेतकरी संघटनेचा उमेदवार मी होतो़ शरद जोशी माझ्या प्रचाराला आले़ मतदारांना उद्देशून म्हणाले, निष्ठेने, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या जातीचाच प्रश्न उद्भवत असेल तर विजय आमुचा पुत्र असल्याचे मी घोषित करतो़ त्या नेत्याची ही वैचारीक उंची होती़ दिवसभर रडून-रडून अश्रू आटल््यानंतर रात्री हुंदके कसेबसे आवरत विजय विल्हेकर त्यांच्या 'साहेंबां'ची ही आठवण 'लोकमत'ला सांगत होते़ (प्रतिनिधी)
साहेबांच्या 'त्या' वाक्यावर झालो फिदा !
By admin | Updated: December 13, 2015 00:04 IST