शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील वाघांची सुरक्षा दुर्लक्षित, सीबीआय चौकशी का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:23 IST

पान ३ ची लिड अनिल कडू परतवाडा : मेळघाटात वाघ मरणे आणि मारणे ही नित्याचीच बाब झाली आहे. यात ...

पान ३ ची लिड

अनिल कडू

परतवाडा : मेळघाटात वाघ मरणे आणि मारणे ही नित्याचीच बाब झाली आहे. यात घडत असलेल्या आणि उघडकीस येत असलेल्या घटनांवरून मेळघाटातील वाघांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह लागले आहे. राजस्थानातील वाघांच्या शिकारीबाबत सीबीआय चौकशी होते, तर मेळघाटातील वाघांच्या हत्येची का नाही, असाही सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

मृत्यूनंतर सात ते आठ दिवसांनंतर मेळघाटात त्या वाघाचा मृतदेह कधी तरी पुढे येतो. तेव्हा तो मृतदेह सडलेला, कुजलेला असतो. मागील तीन वर्षांत अशाच पाच घटना पुढे आल्या आहेत.

मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत गुगामल वन्यजीव विभागातील, ढाकणा वनपरिक्षेत्रातील भांडूम बीट अंतर्गत येणाऱ्या कपूरखेडा नाला येथे एका वाघाचा मृतदेह, मृत्यूनंतर तब्बल नऊ दिवसांनी एप्रिल २०१८ मध्ये आढळून आला. याच व्याघ्र प्रकल्पांतर्गत आकोट वनपरिक्षेत्रातील धोंडा आकार राउंडमधील जीतापूर बीटमध्ये टी-३५ नामक वाघिणीचा मृतदेह मृत्यूनंतर तब्बल सहा दिवसांनी ३ मार्च २०१९ ला आढळून आला. अंबाबरवामधील टी-२३ नामक वाघाचा मृतदेह लागूनच असलेल्या मध्य प्रदेशातील सीमेत मृत्यूनंतर १५ दिवसांनी एप्रिल २०२० मध्ये उघडकीस आला.

रायपूर वनपरिक्षेत्रातील माडीझडप परिसरात मृत्यूनंतर पाच दिवसांनी २० जानेवारी २०२१ ला वाघाचा मृतदेह आढळून आला. तत्कालीन प्रादेशिक पूर्व मेळघाट वनविभागात चिखलदरा वनपरिक्षेत्रातील मोथा परिसरात मृत्यूनंतर तब्बल १५ दिवसांनी जानेवारी २०१९ मध्ये एका वाघाचा मृतदेह आढळून आला. यातील काही कुजलेल्या वाघाच्या मृतदेहाचे अवयव प्रयोगशाळेतही पाठविले जातात. वाघ मरतात, सडतात, कुजतात. या मृत वाघांच्या फायली बनविण्यात येतात आणि पुढे या घटना फाइलबंद केल्या जातात.

बॉक्स

वाघाला आयडी नाही

व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या प्रादेशिक वनविभागाच्या जंगलातही वाघ आहेत. ज्या प्रादेशिक वनविभागात वाघ आहेत त्या वाघांना ओळख नाही. आयडी नाही. त्यामुळे ते बेवारस ठरत आहेत, हे मोथा आणि रायपूरमध्ये आढळून आलेल्या वाघांच्या मृतदेहाकडे लक्ष वेधल्यास पुरेसे ठरले आहे.

त्या वाघांचे पुढे काय?

वाघांच्या शिकारीच्या अनुषंगाने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने २०१८ मध्ये एक गुन्हा उघडकीस आणला. यात सन २०१७ आणि २०१८ या दोन वर्षांत चार वाघ आणि एका बिबट्याची शिकार प्रादेशिक वनविभागाच्या अंजनगाव सुर्जी वनपरिक्षेत्रात केल्याची कबुली खुद्द आरोपींनी दिली. पूर्व मेळघाट वनविभागाचे सहायक वनसंरक्षक अशोक पराड यांच्या समक्ष आरोपींचे बयाण घेण्यात आले. ही चौकशी गुंडाळून प्रकरण फाइलबंद केले गेले.

सीबीआय चौकशीची मागणी

सन २००५ मध्ये मनमोहन सिंग असताना राजस्थानमधील सिरस्का व्याघ्र प्रकल्पातील वाघांची चौकशी सीबीआयकडे सोपविण्यात आली होती. सन २००९ मध्येही भंडारा, चंद्रपूरकडील वाघांच्या शिकारींची चौकशी सीबीआयकडून करण्यात आली. याच धर्तीवर मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील वाघांच्या शिकारी आणि आढळून येत असलेल्या वाघांच्या मृतदेहांची चौकशी सीबीआयकडून करण्याची मागणी वन्यजीवप्रेमींनी केली आहे.