चांदूर रेल्वे : कोरोनाकाळात रक्तदानासारख्या पवित्र कार्याची खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे. रक्तदान ही आजच्या काळाची गरज असून, अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. समाजात रक्तदानाविषयी असणारे गैरसमज दूर करून जास्तीत जास्त लोकांमध्ये जनजागृती करून रक्तदान वाढवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी अधिकाधिक लोकांनी पुढे येणे गरजेचे आहे, असे मत चांदूर रेल्वेचे पोलीस निरीक्षक मगन मेहते यांनी व्यक्त केले. ते चांदूर रेल्वे शहरातील अशोक महाविद्यालयात शनिवारी लोकमत समूहातर्फे स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व हारार्पणाने रक्तदान शिबिराला सुरूवात करण्यात आली. माजी न. प. उपाध्यक्ष नितीन गवळी यांनी सर्वप्रथम रक्तदान केले. एकूण १३ जणांनी रक्तदान केले. रक्तसंकलनाचे कार्य इर्विन रक्तपेढीचे डॉ. अविनाश उकंडे, संगीता गायधने, अश्विनी गायगोले, मंगेश उमप, प्रवीण कळस्कर, श्रीकांत थोरात यांनी केले. साहस संस्थेचे अध्यक्ष चेतन भोले, प्रभाकरराव भगोले, इरफान पठान, शहेजाद खान, प्रशांत भगोले, विनय गोटफोडे, राहुल देशमुख आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला लेकमत विशेष प्रतिनिधी राजेश तोटे, माजी नगराध्यक्ष गणेश रॉय, महमूद हुसेन, प्रावीण्य देशमुख, डॉ. क्रांतिसागर ढोले, नीलेश सूर्यवंशी, प्राचार्य जयंत कारमोरे, स्वप्निल मानकर, बंडू आठवले, देवानंद खुने, वा.वा. वातकर, दीपक सोळंके, प्रवीण खेरकर उपस्थित होते. सदर कार्यक्रमासाठी अशोक कला, वाणिज्य महाविद्यालयाचे व साहस जनहितकारी बहुउद्देशीय संस्थेचे विशेष सहकार्य लाभले.
--------------
यांनी केले रक्तदान
शिबिरामध्ये नितीन गवळी, विनय गोटफोडे, सचिन ढोक (ए पॉझिटिव्ह), शुभम मेश्राम, श्रीकांत मोधडे (ओ पॉझिटिव्ह), मंगेश ठवकर, गौरव गायगोले, संजय शिंदे, आकाश तितरे, अभिजित राठोड (बी पॉझिटिव्ह), रोशन गावंडे (एबी पॉजीटिव्ह), अजहर खान युसूफ खान (ए निगेटिव्ह) यांनी रक्तदान केले.
170721\178-img-20210717-wa0027.jpg~170721\img-20210717-wa0024.jpg~170721\179-img-20210717-wa0025.jpg
photo~photo~photo