दोन वर्षाच्या चिमुकलीचा वाचविला जीव
मोहन राऊत/धामणगाव रेल्वे
घरात खेळत असताना आपल्या चिमुकलीनी तोंडात काही तरी टाकले व ते घशात अडकले असल्याचे वडिलांच्या लक्षात आले मात्र तो एक्सरे मध्ये एक रुपयाचा शिक्का असल्याचे आढळले शहरातील सर्वज्ञ हॉस्पिटल चे डॉ मनीष अप्ततूरकर यांनी हा शिक्का यशस्वीरित्या काढून दोन वर्षाच्या चिमुकलीचा जीव वाचविला आहे.
तालुक्यातील येरली येथील माही सतीश भवारकर (२) ही सकाळी घरी खेळत असताना तिने तोंडात काहीतरी टाकल्याचे वडिलाच्या लक्षात आले. त्यांनी लगेच धामणगाव येथील सर्वज्ञ हॉस्पिटलचे संचालक मनीष अप्ततूरकर यांच्या दवाखान्यात आणले. त्यांनी त्या मुलीच्या घशाचा एक्स घेतला असता, एक रुपयाचा शिक्का घशात अडकला असल्याचे दिसले डॉ. अप्ततूरकर यांचे लहान बालकांच्या आरोग्यविषयक असलेले ज्ञान व अनुभव तसेच वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी प्रथम घशात कॅथेटर टाकून आत फुगा फुगविला. त्यात हा शिक्का अडकून बाहेर काढला. अमरावती, यवतमाळ येथे आधुनिक तंत्रज्ञानाचे साहित्य आहे. मात्र, धामणगाव सारख्या शहरातील असे साहित्य उपलब्ध नसतानाही डॉ. मनीष अप्ततूरकर यांनी चिमुकलीच्या घशातून शिक्का काढल्याने त्यांचे वैद्यकीय क्षेत्रात कौतुक होत आहे.