शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पतंगाचा नाद 'त्या' अभाग्याच्या जिवावर बेतला; ३० तासानंतर पडिक विहिरीत मृतदेहच मिळाला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2021 22:40 IST

Amravati News पतंगाचा नाद एका बालकाच्या जिवावर बेतल्याची हृद्यद्रावक घटना बुधवारी रात्री राजापेठ भागात उघड झाली. बेपत्ता झाल्याच्या ३० तासानंतर त्याचा मृतदेहच एका खचलेल्या व झाडाझुडपांनी वेढलेल्या विहिरीत आढळून आला.

अमरावती : पतंगाचा नाद एका बालकाच्या जिवावर बेतल्याची हृद्यद्रावक घटना बुधवारी रात्री राजापेठ भागात उघड झाली. बेपत्ता झाल्याच्या ३० तासानंतर त्याचा मृतदेहच एका खचलेल्या व झाडाझुडपांनी वेढलेल्या विहिरीत आढळून आला. दरम्यान त्याच्यावर गुरुवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. वैभव श्रीकांत आकोडे (१५, जुना कोंडवाडा, राजापेठ) असे मृताचे नाव आहे. राजापेठ कोंडवाड्यापासून सुमारे १ किमी अंतरावरील जयरामनगर येथील एका विहिरीत ८ डिसेंबर रोजी रात्री ११.३० च्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला.

७ डिसेंबर रोजी दुपारी ४.३० च्या सुमारास सायकल घेऊन घरबाहेर पडलेला वैभव परत न आल्याने त्याच्या आईने राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. रात्री ११.५२ च्या सुमारास गुन्हा दाखल करत राजापेठ पोलिसांनी चौकशीस सुरूवात केली. त्या भागातील एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये वैभव हा सायकलने जयरामनगर भागाकडे जाताना दिसतो. तो धागा पकडून ठाणेदार मनीष ठाकरे यांनी वैभवच्या कुटुंबीयांसह त्या भागाचा कानाकोपरा शोधून काढला. दरम्यान त्या भागात दुपारी काही मुले पतंग उडवत होती, अशी माहिती स्थानिकांनी दिली. दरम्यान, पतंग मिळवण्याच्या नादात धावताना वैभवने त्याची सायकल एका भिंतीलगत उभी करून ठेवली होती. सायंकाळपर्यंत ती तशीच राहिल्याने तेथील एका स्थानिकाने ती आपल्या घरात सुरक्षित ठेवली.

दरम्यान, ८ डिसेंबर रोजी त्यांनी ती सायकल ज्या ठिकाणी होती, त्याच ठिकाणी आणून ठेवली. बुधवारी सायंकाळी ती सायकल वैभवची असल्याचे कुटुंबीयांनी ओळखले. त्यामुळे त्याच भागात शोधकार्य करण्यात आले. दरम्यान, वैभवच्या वडिलांचे सहा वर्षांपूर्वी निधन झाले असून, त्याची आई घरकाम करते. मोठी बहीण आयटीआय शिक्षणासाठी औरंगाबाद गेलेली होती. मंगळवारी दुपारी ५ च्या सुमारास कामावरून परतल्यानंतर वैभव सायकल घेऊन बाहेर गेल्याची माहिती त्याच्या आईला मिळाली होती.

अग्निशमनची मदत

ठाणेदार मनीष ठाकरे यांनी बुधवारी सायंकाळपासून रात्रीपर्यंत त्या भागातील नाले, विहिरी पिंजून काढल्या. जयरामनगरात ज्या ठिकाणी सायकल आढळली, तेथे शोध घेत असताना त्या भागात खचलेली विहीर झाडाझुडुपांनी वेढल्याची माहिती ठाकरे यांना मिळाली. मोठ्या टॉर्च घेऊन त्या विहिरीत डोकावून पाहिले असता, त्यात केवळ मानवी केस आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी ती विहीर लक्ष्य करीत महापालिकेच्या अग्निशमन विभागाची मदत घेतली. अखेर बुधवारी रात्री ११.१५ च्या सुमारास त्यातून मृतदेह हाती लागला. त्या मृतदेहाची ओळख वैभव आकोडे म्हणून पटविण्यात आली. तो गाळात फसला होता.

टॅग्स :Deathमृत्यू