शहरं
Join us  
Trending Stories
1
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
2
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
3
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
4
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्सला भिडण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
5
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
6
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
7
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
8
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
9
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
10
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
11
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
12
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
13
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
14
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
15
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
16
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
17
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
18
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
19
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
20
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 

शंभर, दहा, पाच रुपयांच्या नोटा बंद होण्याची अफवाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:29 IST

रिझर्व्ह बॅंकेचे आदेश नाहीत, व्यापारी स्वीकारताहेत नोटा, सर्वसामान्य संभ्रमावस्थेत अमरावती : जुन्या १००, १० आणि ५ रुपयांच्या नोटा बंद ...

रिझर्व्ह बॅंकेचे आदेश नाहीत, व्यापारी स्वीकारताहेत नोटा, सर्वसामान्य संभ्रमावस्थेत

अमरावती : जुन्या १००, १० आणि ५ रुपयांच्या नोटा बंद होणार असल्याच्या अफवांच्या बाजाराने सर्वसामान्य ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेचे कोणतेही आदेश नसून, जुन्या नोटा बँका व संस्था स्वीकारत असल्याचे चित्र आहे. अफवांमुळे बहुतांश नागरिक जुन्या नोटा बॅंकेत जमा करण्यासाठी गर्दी करीत आहेत.

बॅंकांमध्ये सर्वच प्रकारच्या नोटा स्वीकारल्या जात आहे. मात्र, काही दिवसांपासून जुन्या पाच रूपयांच्या नोटा परत करण्याचे प्रमाण वाढीस लागल्याचे एका बॅंक कर्मचार्यांनी सांगितले. यापूर्वी नोटबंदीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा अनुभव घेता, नागरिक पुन्हा जुन्या १००. १० आणि पाच रुपयांच्या नोटा घरी पडून राहू नये, यासाठी बॅंकेत अथवा इतर ठिकाणी भीतभीतच चलनात आणत आहेत. जुन्या पाच रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास अनेकांचा नकार असल्याचे वास्तव आहे. यात दुकानदार, व्यावसायिकसुद्धा सामील आहेत. त्यामध्ये नोटा स्वीकारण्याबाबत औदासीन्य हा मोठा ‘फॅक्टर’ आहे.

------------------------

कोट

रिझर्व्ह बॅंकेचे जुन्या नोटा बंद करण्याबाबत काेणतेही आदेश नाहीत. कोणत्याही बॅंकेकडून त्यासंबंधी तक्रारसुद्धा नाही. केवळ जुन्या नोटा बंद होत असल्याची अफवा पसरविली आणि नागरिकांमध्ये वेग़ळी चर्चा सुरू झाली, असा हा प्रकार आहे.

- जितेंद्र झा, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅंक

-------------

कोट

जुन्या १००, १० आणि ५ रुपयांच्या नोटा चलनात आहे. बॅंकही त्या स्वीकारत आहे. नोटा बंद करण्याबाबत कोणत्याही बॅंकेने तसे काही कळविले नाही. सर्वसामान्यांनी संशय ठेवावा. जुन्या नाेटा तूर्त बंद होणार नाही. आम्ही दैनदिन व्यवहारात नोटा स्वीकारत आहोत.

- पवन ग्वालानी, व्यापारी.

----------------------

कोट

काही दिवसांपासून अचानक जुनी पाच रुपयांची नोट चलनातून बाद झाल्यासारखी स्थिती आहे. ग्राहकांकडूनही पाच रुपयांची नोट दिली जात नाही. मात्र, जुन्या १०० व १० रुपयांच्या नोटांविषयी काहीही तक्रारी नाही. व्यवहार सुरळीत सुरू आहेत.

- नरेंद्र भाराणी, व्यापारी,

-------------

बॉक्स

रिझर्व्ह बॅंकेचे आदेश ‘ना’

जुन्या १००, १० आणि ५ रुपयांच्या नोटा बंद होण्याबाबत कोणतेही आदेश नाही. मात्र, बाजारात जुन्या नोटा बंद होत असल्यामुळे ग्राहकांकडून विशेषत: पाच रुपयांच्या नोटा घेण्यात येत नाही, असे कमलेश नाईक या ग्राहकाने ‘लोकमत’ला सांगितले. परंतु, जुन्या नोटा बंद हाेणार नाहीत. रिझर्व्ह बॅंकेचे कोणत्याही प्रकारचे आदेश नाहीत, ही बाब बॅंकांनी स्पष्ट केली आहे. नोटा बंद होण्याच्या केवळ अफवा असून, विश्वास ठेवू नका, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

----------------------------

पाच रुपयांच्या नोटा जमा करण्यास गर्दी

राष्ट्रीय, राज्य अथवा सहकारी बॅंकांमध्ये जुन्या पाच रुपयांच्या नोटा परत करण्यासाठी गर्दी वाढत आहे. जुन्या दहा किंवा शंभर रुपयांच्या नोटा जमा करण्यास फारसा प्रतिसाद नाही, असे वास्तव आहे. काही दुकाने अथवा प्रतिष्ठानांमध्ये जुन्या पाच रुपयांच्या नोटा चलन म्हणून स्वीकारत नाही.