शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

नियम गॅसवर!

By admin | Updated: June 14, 2014 23:00 IST

शहर पोलीस आयुक्तालयात सुरू असलेल्या पोलीस भरतीमध्ये दररोज सहभागी होणाऱ्या हजारोे उमेदवारांसाठी परिसरात पाणी तसेच चहा-नाश्त्याचे स्टॉल लावण्यात आले आहेत.परंतु या स्टॉल्समध्ये अन्नपदार्थ

पोलीस भरती : अंमलदारांदेखत कायद्याची ऐशीतैशी प्रसन्न दुचक्के - अमरावतीशहर पोलीस आयुक्तालयात सुरू असलेल्या पोलीस भरतीमध्ये दररोज सहभागी होणाऱ्या हजारोे उमेदवारांसाठी परिसरात पाणी तसेच चहा-नाश्त्याचे स्टॉल लावण्यात आले आहेत.परंतु या स्टॉल्समध्ये अन्नपदार्थ शिजविण्यासाठी सर्रास नियम धाब्यावर बसवून घरगुती गॅस सिलिंडरचा वापर केला जात आहे. ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये हा प्रकार उघड आला. शहर पोलीस भरती प्रक्रिया ६ जूनपासून सुरू झाली. भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांची गैरसोय टाळण्यासाठी स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांकडूून आवश्यक त्या उपाययोजना केल्या गेल्या. याच अनुषंगाने येथे खाद्यपदार्थांचे स्टॉलही लावण्यात आले; मात्र तेथे चक्क घरगुती गॅस सिलिंडरचा वापर होतोय.अपघात घडल्यास जबाबदार कोण ?पोलीस मुख्यालय व विद्यापीठाच्या प्रांगणात ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. त्यामुळे तेथे पाणी व चहा-नाश्त्याचे हॉटेल लावण्यात आले आहे. यातील पोलिसांचा परिसर म्हणून ओळखला जाणाऱ्या पोलीस मुख्यालयासमोरील प्रांगणात चहा-नाश्त्याचे हॉटेल लावण्यात आले आहे. संबंधित व्यक्ती हा कॅटरर्सचा व्यवसाय करतो. पोलीस भरती प्रक्रिया पार पडेपर्यंत त्याने पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीने मुख्यालयासमोरील फुटबॉल मैदानासमोर हॉटेल थाटले आहे. हे हॉटेल सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू असते. या कालावधीत हॉटेलवर गरमागरम भजी व नाश्ता घेण्यासाठी शेकडो उमेदवारांसह अधिकारी, कर्मचाऱ्यांची गर्दी उसळते. परंतु पोलिसांच्या देखतच सार्वजनिक ठिकाणी या हॉटेलमध्ये घरगुती सिलिंडरचा वापर होत आहे.खुलेआम सुरू असणाऱ्या या सिलिंडर व गॅस शेगडीकडे अनेकांचे लक्ष जाते. परंतु पोलीस कर्मचाऱ्यांचे या नियमबाह्य प्रकाराकडे दुर्लक्ष आहे. कुठल्याही ठिकाणी व्यवसाय करायचा असेल तर कमर्शिअल सिलिंडरचाच वापर करावा, असा शासन नियम असतानाही हे हॉटेल व्यावसायिक चक्क नियम धाब्यावर बसवून समोरच व्यवसाय थाटत आहे. थेट घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करीत असल्याचे वास्तव पुढे आले आहे. संबंधित हॉटेल व्यावसायिक घरगुती सिलिंडरचा वापर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमोरच खुल्या जागेत करीत असल्याने तेथील परिसरात हा चर्चेचा विषय बनला आहे. यावर प्रकरणी पोलीस आयुक्त आपली काय भूमिका बजावितात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)