शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओत दलालराज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2016 00:06 IST

येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात तसेच बाहेरसुद्धा दलालांचा सुळसुळात असून नागरिकांजवळून शिकाऊ परवाना व दुचाकी, चारचाकी वाहनांचा परवाना काढण्यासाठी हजारो रुपये उखळल्या जात आहे.

अधिकाऱ्यांचे अभय : नागरिकांची लूटसंदीप मानकर अमरावती येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात तसेच बाहेरसुद्धा दलालांचा सुळसुळात असून नागरिकांजवळून शिकाऊ परवाना व दुचाकी, चारचाकी वाहनांचा परवाना काढण्यासाठी हजारो रुपये उखळल्या जात आहे. याला आरटीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे अभय असून सर्वत्र दलालराज फोफावला आहे. 'लोकमत'च्या प्रतिनिधीने आरटीओ कार्यालयात फेरफटका मारला असता समस्यांचे महापूर पहायला मिळाला. अमरावती प्रादेशिक परिवहन कार्यालयातून पाच जिल्हयाचे कामकाज चालते. त्यामुळे येथे विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांचा राबता असतो. त्यामुळे येथे अनेक दिवसांपासून दलालराज फोफावला आहे. कुठलेही काम असल्यास हे दलाल नागरिकांना बोटावर मोजण्या इतक्या दिवसात करून देतात व येथूनच सुरू होते विद्यार्थ्यांसह नागरिकांची लूट. येथे येणाऱ्या नागरिकांना प्रवेशव्दाराच्या बाहेर किंवा आवारातच घेरले जाते. तेथे आपणाला कुठले काम आहे, हे विचारले जाते. कुठल्या वाहनांचा परवाना हवा, यासंदर्भात विचारणा करण्यात येते. नागरिकांनी होकार देताच कामाचे दर ठरतात. या दलाललांकडू साहेब माझ्या ओळखीचे आहे, अशी पुष्टी त्यांना दिली जाते. तुम्ही स्वत: जाऊन काम केले तर एवढे पैसे लागतील व लवकर काम होणार नाही. वेळ पडल्यास कागतपत्रे नसतील तर कामच होणार नाही, अशी भीती संबंधितांन दाखविली जाते व येथूनच दलालांचा पैसे लुटण्याचा गौरखधंदा सुरू होतो. आरटीओ परिसरात व कार्यालयाबाहेर ३०० ते ४०० दलाल आहेत. कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांपेक्षा आरटीओ कार्यालयात दलालांचीच गर्दी जास्त असते. त्यामुळे हे दलाल आरटीओ कार्यालय परिसरात शिरतातच कसे, असा प्रश्न विचारला जात आहे. याला आरटीओच्या अनेक परिवहन अधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकाऱ्याचे अभय का, असा प्रश्न येथे येणारे नागरिक विचारत आहेत. शिकाऊ लायसन्सचे ३०० तर परवान्याचे ७०० रुपयेनियमांने जर नागरिकांनी शिकाऊ लायसन्स काढले तर ते ३१ रुपये शुल्क भरून मिळते. दुचाकी, चारचाकी वाहनांचा परवाना काढयांचा असेल तर ३१६ मोटरवाहन परवाना व युटीएल (युनायटेड टेलीकॉम लि.) शुल्क भरून परवाना काढला जातो. प्रत्येक परवाना क्लासप्रमाणे त्याचे शुल्क वाढतात. पण बाहेर किंवा दलालाच्या तावडीत जर नागरिक सापडला तर लर्निंग लायसन्सचे ३०० रुपये तर परवान्याचे ७०० ते १०००रुपया प्रमाणे पैसे उखडण्यात येते. पीयूसी व्हॅनवर कारवाई केव्हा? आरटीओ कार्यालया बाहेर रस्त्यावर नियमांचे उल्लंघन करुन वाहने ठेवली जातात. येथे कार्यरत पीयूसी व्हॅनमध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती आॅनलाईन करण्यासाठी ५० ते ८० रुपये शुल्क आकारले जातात. येथूनही वाहन परवाना काढून देण्याच्या नावावर पैसे उकळतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.विद्यार्थ्यांची लूट येथे शिकाऊ परवान्यासाठी विद्यार्थी येतात. परंतु त्यांच्याजवळ टीसी.ची मूळ प्रत नसते. शिकाऊ परवाना काढण्यासाठी हे दाखविणे बंधणकारक आहे. नेमकी हीच संधी साधून गरजेनुसार तत्काळ काम करुन देण्याच्या नावावर साहेबांना पैसे द्यावे लागतील, असे सांगून दलाल विद्यार्थ्यांकडून अव्वाच्या सव्वापट रक्कम वसूल केले जाते.