शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई मोफत प्रवेशाची ‘पॉवर ओसरला’

By जितेंद्र दखने | Updated: April 23, 2024 21:10 IST

पालकांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे प्राधान्यक्रमच भरता येईना

अमरावती : आरटीई प्रवेशाच्या माध्यमातून इंग्रजी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा, यासाठी पालक आटापिटा करीत होते; परंतु राज्य शासनाने दिलेले शाळांचे प्राधान्य लक्षात घेऊन प्राधान्यक्रम भरायचे असल्यामुळे पालकांना इंग्रजी शाळांचे प्राधान्यक्रमच भरता येत नसल्याची ओरड होत आहे. त्यामुळे इंग्रजी शाळांमध्ये प्रवेशाची संधी मिळणार नसल्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रिया नावालाच राहिली असून, आरटीई प्रवेशाची ‘पॉवर’ संपल्यात जमा झाल्याची भावना पालकांमधून व्यक्त होत आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित, दुर्बल, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांतील विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत प्रवेश दिले जातात, त्यासाठी नोंदणी सुरू झाली आहे. जिल्ह्यात २२ हजार ४०१ जागांकरिता आतापर्यंत केवळ ७०० विद्यार्थ्यांचे अर्ज भरले. अर्ज सादर करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत मुदत आहे. शालेय शिक्षण विभागाने यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेत बदल केला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांची शाळा नसल्यासच एक किलोमीटरच्या अंतरावरील स्वयंअर्थसाहाय्यित शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. शाळा निवडताना अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आणि त्यानंतर स्वयंअर्थसाहाय्यित शाळा या प्राधान्यक्रमानुसार प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे पालकांनी राहण्याचे ठिकाण टाकल्यानंतर त्यांच्या परिसरात इंग्रजी शाळेचा पर्याय निवडला, तर तुम्ही हा पर्याय निवडण्यास पात्र नसल्याचे वेबसाइटवर स्पष्ट केले जाते. त्यामुळे पालकांना आपल्या पाल्याला इंग्रजी शाळेत मोफत शिकवण्याचे स्वप्नावर पाणी फिरले आहे. सातवीनंतर प्रवेश कुठे घ्यायचा ?शाळा निवडीसाठी पालकांसमोर मोठी यादी येत असून, त्यात अनेक शासकीय शाळा चौथी व  सातवीपर्यतच आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार या राखीव जागांमधून सरकारने आठवीपर्यत शिक्षण मिळणे अपेक्षित आहे. नवीन शिक्षण धोरणाप्रमाणे पूर्वप्राथमिक ते दहावीपर्यत स्वस्त आणि उत्तम दर्जेदार शिक्षण शासनाने उपलब्ध करून देणे गरज आहे. असे असताना चौथी किंवा सातवी झाल्यानंतर या मुलांना शासन कुठे प्रवेश देणार, असा प्रश्न पालकांकडून उपस्थित होत आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती