अमरावती : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, त्यासाठी तीन दिवसांत १ हजार २१४ पालकांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत.
आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी ३ मार्चपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली. २१ मार्चपर्यंत प्रवेशासाठी पालकांना अर्ज करता येणार आहे. जिल्ह्यात ६ मार्च रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत १ हजार २१४ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. आरटीईसाठी गतवर्षी राज्यस्तरावर एकदाच लॉटरी काढण्यात आली. त्यानंतर पाच वेळा प्रतीक्षा यादीला मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे गतवर्षीची प्रवेशप्रक्रिया ही जानेवारी महिन्यापर्यंत लांबली. यावर्षी सर्वांत जास्त अर्ज शहरी भागातून दाखल होत आहेत. त्यापाठोपाठ इतर ग्रामीण भागातून दाखल झाले आहेत.
बॉक्स
२४४ शाळा, २०७६ जागा
आरटीई अंतर्गत जिल्ह्यात यंदा २४४ शाळांनी नोंदणी केली. या शाळांमध्ये यावर्षी २ हजार ७६ जागा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यंदा प्रक्रिया सुरू झाल्यापासून पालकांचा अर्ज भरण्यासाठीचा प्रतिसाद चांगला मिळत आहे.