महिला पोलिसांचे प्रकरण : राज्य महिला आयोगाचे निर्देशअमरावती : महिला पोलीस शिपायाला एसीपीने शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी राज्य महिला आयोगाने लक्ष वेधले आहे. सोमवारी आयोगाच्या सदस्य आशा मिरगे यांनी प्रभारी पोलीस आयुक्त सोमनाथ घार्गे यांच्याशी चर्चा करुन आरएसआय रवी बान्ते याची चौकशी करण्याची सूचना दिली. सोमवारी राज्य महिला आयोग सदस्य आशा मिरगे यांनी प्रभारी पोलीस आयुक्त सोमनाथ घार्गे यांच्याशी चर्चा करुन प्रकरणाचे गांभीर्य जाणून घेतले. यावेळी पीडीत महिला पोलीस शिपायाचेही म्हणणे त्यांनी ऐकले. यामध्ये पोलीस मुख्यालयातील आरएसआय बान्ते यांची मध्यस्थी असल्याचे आढळून आले आहे. महिला पोलिसांशी एसीपीने असभ्य भाष्य केल्याचे खरे आहे. याप्रकरणात मध्यस्थी करणाऱ्या आरएसआय बान्ते सहआरोपी करायचे निर्देश देण्यात आले असून पीडीताचे पुरवणी बयाणसुध्दा नोंदविणार आहे. पीडित महिलेला तीन महिन्यांची रजा देण्यात आली आहे. -आशा मिरगे, सदस्य, राज्य महिला आयोग.
आरएसआय रवी बान्तेची होणार चौकशी
By admin | Updated: April 28, 2015 00:21 IST